‘तुकडे तुकडे गँग’च सरकार चालवतय, शशी थरुर यांचा अमित शहांवर हल्लाबोल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | तुकडे तुकडे गँग हा नक्की काय प्रकार आहे हे जाणून घेण्यासाठी साकेत गोखले या भारतीय नागरिकाने माहिती अधिकारातून माहिती मागवली असता ही संकल्पना फक्त अमित शहांना माहीत असल्याचा खुलासा अधिकाऱ्यांकडून देण्यात आला. याच खुलाशाचा आधार घेत काँग्रेसचे राज्यसभा खासदार शशी थरुर यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. अभ्यासू विद्यार्थ्यांना आणि विचारवंतांना तुकडे करणारे असं संबोधणारे अमित शहाच खरे तुकडे तुकडे गँग चालवत असून सध्याचं सरकारही तुकडे तुकडे गँगच चालवत असल्याची खरमरीत टीका शशी थरुर यांनी केली आहे.

 

२०१६ साली दिल्लीतील जवाहरलाल नेहरु विद्यापीठात झालेल्या विद्यार्थी आंदोलनानंतर तुकडे तुकडे गँग या शब्दप्रयोग अमित शहांनी वापरात आणला होता. आपल्या भाषणांतही वारंवार ते या शब्दाचा उल्लेख करतात.

सुधारित नागरिकत्व कायद्याला विरोध करणारे लोक हे तुकडे तुकडे गँगचे सदस्य असल्याचं अमित शहा म्हणाले होते. यावर माहिती अधिकारात खुलासा मागितला असता तुकडे तुकडे गँगचा संदर्भ देता येणार नाही असं उत्तर गृहमंत्रालायकडूनच देण्यात आलं. आता याबाबतीतील स्क्रीनशॉट थरुर यांनी ट्विट करत शहांवर हल्लाबोल केला आहे.