तुकाराम मुंढेंची बदली! बदली! बदली!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई | कुठल्याही दबावाला न जुमानता काम करणारे सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली करण्यात आली आहे. ही बदली आता थेट एड्स नियंत्रण मंडळावरच करण्यात आली आहे.

मुंढे यांची नुकतीच नाशिक महापालिका आयुक्त पदावरून मंत्रालयात बदली करण्यात आली होती. या बदलीला फक्त एक महिना होत आलेला असताना आता त्यांची पुन्हा बदली करण्यात आली अाहे.

कठोरपणाने प्रशासनात शिस्त आणणे आणि कोणतीही बेकायदा गोष्ट कायद्याची कडक अंमलबजावणी करुन मोडून काढणे या त्यांच्या धडाकेबाज कार्यशैलीमुळे ते राजकारण्यांचे नावडते अधिकारी असल्याचे मानले जाते. त्यामुळे ज्या धडाक्याने ते काम करतात, त्याच धडाक्याने त्यांच्या बदल्या होतात.

Leave a Comment