सातारा प्रतिनिधी | जावळी तालुक्यातील दापवडी येथील “हरी के लाल” म्हणुन नावलैाकीक असलेल्या हातगेघर पुनर्वसन प्रकल्पग्रस्तांनी ठगगिरी करत शासनाकडुन उदारनिर्वाह भत्ता घेवुनदेखील पुन्हा उदारनिर्वाह भत्ता लाटला असल्याची धक्कादायक पोलखोल आकाश रांजणे यांनी केली आहे. या प्रकारानंतर सहाय्यक कार्यकारी अभियंता, कृष्णानगर यांनी दापवडी सरपंचाना नोटीस काढत उदरनिर्वाह भत्ता १ लाख ५८ हजार ८०० रुपये परत भरण्याचे आदेश दिले आहेत. ८ दिवसांच्या आत पैसे न भरल्यास हमीपत्राप्रमाणे गुन्हा दाखल करण्याची ताकीत वजा समज या पत्राद्वारे दिली असल्याने जावलीतील हातगेघर प्रकल्पाला गालबोट लागलं असल्याची चर्चा जावलीत रंगली आहे.
मौजे दापवडी गावाचे मुळचे स्थायिक विनायक आनंदराव रांजणे,जयेश विनायक रांजणे जयंत विनायक रांजणे, तसेच अमित विनायक रांजणे यांना मौजे रांजणी येथील जमीन महु – हातेघर धरणात बुडीत क्षेत्रात असल्याने शासनाकडून जमीन देण्यात आली होती परंतु याबाबत आकाश बाजीराव रांजणे यांनी मा.जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल करून पुनर्वसन घोटाळा झाला असून यामधील दोषी अधिकारी व लाभ धारक यांच्यावर फौजदारी गुन्हा नोंद करण्याबाबत तक्रार दाखल केली होती. याबाबत सविस्तर चौकशी होऊन जिल्हा पुनर्वसन अधिकारी समीक्षा चंद्राकर यांनी आकाश रांजणे यांच्या तक्रारीत तथ्य असल्याने याबाबत अहवाल जिल्हाधिकारी यांना सादर केला. चौकशी सुरु असताना संबधित इसमांना भत्ता अदा करण्यात येऊ नये अशी मागणी रांजणे यांनी केली होती. त्यावर तत्कालीन उपविभागीय अधिकारी स्वाती देशमुख यांनी पाटबंधारे खात्यास वरील इसमांना भत्ता अदा करू नयेत असे आदेश दिलेले होते. परंतु तत्कालीन तहसीलदार रोहिणी आखाडे यांनी कायदेशीर बाबींची शहानिशा न करता संबधित इसमांच्या बाजूने अहवाल दिला. त्यानुसार पुढील आदेश झालेला नसताना तसेच जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रकरण प्रलंबित असताना तत्कालीन कार्यकारी अभियंता चावरे यांनी भत्ता अदा केला होता. याबाबत रांजणे यांनी तक्रार देऊन तत्कालीन कार्यकारी अभियंता चावरे तसेच तहसीलदार आखाडे यांच्याकडून सदर भत्ता वसूल करा अशी तक्रार दिली होती. त्यानुसार पाटबंधारे खात्याने भत्ता अदा करताना नमूद इसमाकडून प्रतिज्ञा पत्र लिहून घेतले होते. त्यानुसार जिल्हाधिकारी यांचेकडील निकाल विरोधात गेल्यास भत्ता परत करीन अन्यथा फौजदारी गुन्हा दाखल करावा त्यानुसार पाटबंधारे विभागाने जिल्हा पुनर्वसन अधिकारी यांचा अहवाल ग्राह्य धरून विनायक रांजणे,जयंत रांजणे,जयेश रांजणे, अमित रांजणे यांना भत्ता परत करण्याबाबत वारंवार कळवून देखील त्यांनी भत्ता जमा न केल्याने कार्यकारी अभियंता यांनी सहाय्यक कार्यकारी अभियंता यांना ८ दिवसात संबधित इसमांनी भत्ता जमा न केल्यास कायदेशीर कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार आज सहाय्यक कार्यकारी अभियंता यांच्या वतीने अधिकारी श्री सावंत यांनी दापवडी येथील सरपंच यांना पत्रव्यवहार करून समक्ष गावात जाऊन पंचनामा केला असून सदर इसमाना ८ दिवसात भत्ता अदा करण्याबाबत ताकीद दिली आहे. तो जमा न केल्यास फौजदारी गुन्हा दाखल करण्याबाबत ची कारवाई चे पत्र दिले आहे. याबाबत संबधित अधिकारी व लाभ धारक ज्यांनी संकलन मध्ये बोगस नावे दाखल केली आहेत त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा तसेच अजुन किती बोगस संकलन तयार केली आहेत व भूखंड वाटप केले आहेत याबाबत चौकशी व्हावी अशी मागणी आकाश बाजीराव रांजणे यांनी केली आहे. तरी पाठबंधरे खात्याने भत्ता परत मागितल्याने अनेक बोगस खतेधरकांचे धाबे दणाणले आहेत. व पुनर्वसन च्या नावाखाली काही नेत्यांनी शासनाचा गैरफायदा घेतल्याचे व त्यास अधिकारी व शासकीय यंत्रणेने सहकार्य केल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे याबाबत प्रशासन आता काय कारवाई करणार याकडे लक्ष लागून राहिले आहे.
सन २०११ साली जेव्हा महू हातेघर पुनर्वसन जमीन वाटप सुरू होते तेव्हा याच विनायक आनंदराव रांजणे यांनी आकाश रांजणे यांना मिळालेली जमीन रांजणे यांचे कोणतेही अधिकारी पत्र नसताना स्वतः ताबा घेतली होती व तत्कालीन उपविभागीय अधिकारी रामदास जगताप यांनी मुळ खातेदार यांना पसंती नुसार जमीन वाटप करणे बंधनकारक असताना विनायक रांजणे यांची सही घेऊन आकाश रांजणे यांची जमीन वाटप केली होती यावरून अधिकारी यांचे यामध्ये हितसंबंध दिसून येत आहेत तसेच सदर इसमाचा जवळचा नातेवाईक या भागातील धरणग्रस्त नेता असल्याने वरील नियमबाह्य लाभ अधिकाऱ्याकडून पदरात पाडून घेतले असल्याचे दिसून येते याबाबत संपूर्ण पुनर्वसन ची चौकशी व्हावी म्हणून मा.उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे आकाश रांजणे यांनी सांगितले.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’