कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर
इचलकरंजी नगरपालिकेच्या आरोग्य विभागाने तेरवाड बंधाऱ्या लगतच्या पंचगंगा नदीपात्रातील मृत माश्याची विल्हेवाट लावली. दूषित पाण्याने मृत पडलेल्या या माश्यांना जेसीबीच्या सहाय्याने इचलकरंजीकडे रवाना केलं गेले. पंचगंगा नदी प्रदूषणप्रश्नी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने घेतलेल्या आक्रमक पवित्र्यानंतर इचलकरंजी नगरपालिकेने ही मोहीम हाती घेतली होती.
सकाळी इचलकरंजी नगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या पथकाने ही मोहीम सुरू केली होती. लाखो मृत मासे हे तेरवाड बंधाऱ्याला तरंगत होते. तेरवाड बंधाऱ्याचे बर्गे काढून हे मासे पुढे प्रवाहित केले असते तर पुढील नांदणी शिरोळ, नृसिंहवाडी गावांना याचा त्रास झाला असता. त्यामुळं स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हे मृत मासे इचलकरंजी नगरपालिकेने काढून इचलकरंजीत त्यांची विल्हेवाट लावावी असा पवित्रा घेतला. दरम्यान, इचलकरंजी नगरपालिकेन ही मोहीम हाती घेतली.
ताज्या बातम्या थेट तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आजच आमच्या 8080944419 या नंबरवर Whatsapp करा आणि लिहा ”Hello News”