पंढरपूर : पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात मोबाईल नेण्यास बंदी घालण्यात आली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय मंदिर समितीने घेतला आहे. मंदिराच्या बाहेर या संबंधीचे सूचना फलक लावण्यात आले आहेत.
या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी 1 जानेवारीपासून सुरू करण्यात आली आहे. भाविकांना मोबाईल ठेवण्यासाठी दर्शन मंडपात मोबाईल लॉकरची सोय उपलब्ध करून देण्यात आली असून प्रतिमोबाईल 2 रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. मंदिर समितीने सुमारे अडीच हजार मोबाईल लॉकरची सोय केलेली आहे. भाविकांनी मोबाईल मोबाईल लॉकरमध्येच ठेवावेत, इतरत्र मोबाईल ठेऊ नये असे आवाहन मंदिर समितीने केले आहे.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी देशभरातून भाविक येत असतात.