पडळकरांनी वंचितची साथ सोडल्याने होणार मोठे परिणाम

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी। धनगर समाजाच्या आरक्षणावरुन राज्यभर प्रचाराची राळ उठवून अल्पावधीत प्रसिध्द झालेले नेते गोपीचंद पडळकर यांनी वंचित बहुजन आघाडीच्या महासचिव पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी काळात ते भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सांगली लोकसभा मतदार संघात त्यांनी वंचित घटकांचे जोरदार संघटन करुन तीन लाखांहून अधिक मते खेचली होती मात्र. आता त्यांनी ‘वंचित’ची साथ सोडल्यामुळे त्याचे मोठे परिणाम विधानसभा निवडणुकीत होणार आहेत. सांगली जिल्ह्यात याचा फायदा कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला होऊ शकतो.

आघाडीच्या वतीने ‘वंचित’ ही भाजपची ‘बी’ टीम असल्याचा जाहीर आरोप करण्यात आला होता. गोपीचंद पडळकर यांना लोकसभेत जे मतदान झाले होते त्यापैकी जत, खानापूर-आटपाडी व तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदार संघात चांगले मतदान झाले होते. या ठिकाणी दलित, धनगर, काही प्रमाणात मुस्लिम तर ओबीसी घटक एकत्र आल्याचे चित्र होते. पडळकरांनी वंचितची साथ सोडल्याने त्याचे राजिकीय वर्तुळात मोठे परिणाम पहायला मिळतील असं बोललं जातंय

Leave a Comment