परीक्षेला जाण्यासाठी विद्यार्थ्यांना ही प्रवास सेवा राहणार उपलब्ध ; रेल्वेकडून माहिती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । पदवी परीक्षा नको म्हणणाऱ्या विद्यार्थी-पालकांना सर्वोच्च न्यायालयात दिलासा मिळालेला नाही. राज्य परीक्षा न घेता विद्यार्थ्यांना पदवी बहाल करू शकत नाहीत, असा महत्त्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. त्यामुळे आता सर्वत्र अंतिम वर्षाच्या परीक्षा होणार आहेतच मात्र इतरही परीक्षा होणार आहेत. काही परीक्षांची वेळापत्रकेही  जाहीर झाली आहेत. राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांना कोविड काळात परीक्षा घेणे शक्य नाही ते यूजीसीकडे परीक्षा लांबणीवर टाकण्याची मागणी करू शकतात, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले असले तरी विद्यार्थ्यांना पदवीशिवाय उत्तीर्ण करण्याचे निर्देश आपत्कालिन व्यवस्थापन कायद्याच्या कक्षेबाहेरचे आहेत, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले होते.  त्यामुळे आता अंतिम वर्षाच्या परीक्षा होणार आहेत. मुंबई विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष २०१९-२०च्या अंतिम सत्राच्या विद्यार्थ्यांच्या व त्यांच्या विविध बॅकलॉग परीक्षेच्या आयोजनाबाबत मुंबई विद्यापीठाकडू परिपत्रक काढण्यात आले आहे. याद्वारे मुंबई विद्यापीठाशी संलग्नित सर्व महाविद्यालयांना परीक्षेसंदर्भात व अन्य सूचना करण्यात आल्या आहेत. या परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना उपनगरी सेवेद्वारे प्रवास करता येणार असल्याचे मध्य रेल्वेने सांगितले आहे. 

“महाराष्ट्र शासनाने मंजूर केल्याप्रमाणे, अंतिम वर्षाची परीक्षा आणि आगाऊ अभ्यासासाठीच्या इतर स्पर्धा परीक्षेस बसणार्‍या विद्यार्थ्यांना वैध ओळखपत्र व हॉल तिकिटे दाखवून मुंबई उपनगरी नेटवर्कवर विशेष उपनगरी सेवेद्वारे प्रवास करण्याची परवानगी आहे” अशी माहिती  मुंबई सीएसटी चे जनसंपर्क अधिकारी यांनी दिली आहे. मुंबई विद्यापीठाच्या परिपत्रकात, शैक्षणिक वर्ष २०१९-२०च्या अंतिम सत्राच्या विद्यार्थ्यांच्या व त्यांच्या बॅकलॉग परीक्षांच्या आयोजनासाठी विद्यापीठाच्या विविध सक्षम प्राधिकरणांनी घेतलेल्या धोरणात्मक निर्णयानुसार सर्व महाविद्यालयांनी कार्यवाही करावी. असे सांगण्यात आले आहे.  तसेच शैक्षणिक वर्ष २०१९-२०मधील अंतिम सत्राच्या पदवी, पदव्युत्तर व पदविका या परीक्षेस प्रविष्ट विद्यार्थी व त्यांच्या बॅकलॉगच्या परीक्षांसाठी प्रविष्ट विद्यार्थांनी परीक्षा अर्ज सादर केले असतील, त्याच विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात यावी. असेही म्हंटले होते. 

आता अंतिम वर्षाच्या तसेच इतर परीक्षा या त्या त्या केंद्रावर होणार असल्याचेही स्पष्ट झाले आहे. राज्यातील कोरोना स्थिती पाहून योग्य ती खबरदारी घेऊनच प्रवास करता येणार आहे. परीक्षा केंद्रावरही सर्व प्रकारची काळजी घेतली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’

Leave a Comment