पाकिस्तानात पहिल्यांदा बनली हिंदू महिला पोलीस अधिकारी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

वृत्तसंस्था | पाकिस्तानातील सिंध प्रांतात एखादी हिंदू महिला पोलीस अधिकारी झाल्याचे पहिल्यांदाच घडले आहे. पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील पोलिसांनी पहिल्यांदाच आपल्या पथकात एखाद्या हिंदू महिलेचा समावेश करून घेतला आहे. पुष्पा कोल्ही नाव असलेल्या या महिलेने स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन ही कामगिरी केली आहे. बुधवारी माध्यमांकडून याबाबत माहिती देण्यात आली. पुष्पा यांना सहाय्यक उपनिरीक्षक या पदावर नियुक्त करण्यात आले आहे.

ही बातमी सर्वात अगोदर मानवधिकार कार्यकर्ते कपिल देव यांनी ट्विटद्वारे मंगळवारी शेअर केली होती. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, “पुष्पा कोल्ही हिंदू समाजातील पहिली महिला ठरली आहे, जी सिंध प्रांतातील नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण होऊन, सिंध पोलिसात सहाय्यक उपनिरीक्षक झाली आहे.

त्यांना आणखी बळ मिळो.”पाकिस्तानातील हिंदू समाजाच्या सुमन पवन बोदानी यांना जानेवारीत दिवाणी व न्यायिक दंडाधिकारीपदी नियुक्त करण्यात आले होते. बोदानी सिंध प्रांतातील शाहदादकोट येथील आहेत. त्यांनी बीबीसी उर्दूला मुलाखत देताना सांगितले होते की, त्या सिंधमधील अशा अविकसीत ग्रामीण भागातुन आहेत, ज्या ठिकाणी त्यांनी गरिबीशी संघर्ष करणाऱ्या लोकांना अनेक संकटांना तोंड देताना पाहिले आहे.

तसेच त्यांच्या प्रयत्नांमध्ये त्यांच्या सर्व परिवाराने त्यांना साथ दिली व न्यायाधीश बनण्याचे त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यास मदत केली असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.पाकिस्तानात सर्वात मोठा अल्पसंख्याक समाज हा हिंदूंचा आहे. अधिकृत आकडेवारीनुसार पाकिस्तानात ७५ लाख हिंदू आहेत. सिंध प्रांतात हिंदू समाजातील लोकांची संख्या सर्वाधिक आहे. या ठिकाणी ते आपली संस्कृती, परंपरा आणि भाषेची तेथील मुस्लीम नागरिकांबरोबर देवाणघेवाण करत असतात.

Leave a Comment