पुण्यातील फर्ग्युसन रोडवर तरुणाईचे जंगी ‘सेलिब्रेशन’;  जल्लोषात केलं नवीन वर्षाच स्वागत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे : पुण्यातील फर्ग्युसन रोड नवीन वर्षाच स्वागत करण्यासाठी दरवर्षी प्रमाणे गजबजून गेला. तरुणाईच्या चेहऱ्यावरील उत्साह ओसांडून वाहताना दिसत होता. प्रत्येकजण कधी एकदा 12 वाजतील आणि 2020 या वर्षामध्ये प्रवेश होईल याकडे लक्ष्य ठेऊन होता आणि अखेर 12 AM ही वेळ मोबाईलच्या स्क्रीनवर झळकली आणि तरुणाईने एकच जल्लोष केला. 12 वाजताक्षणी फटाक्यांची आतिषबाजी सुरू झाली. फटाक्यांच्या मनमोहक आतिषबाजीने सर्वांचे लक्ष्य वेधून घेतले. अनेकांनी हा क्षण आपल्या प्रिय मित्रांसोबत सेल्फीत कैद केला.

अनेकांनी नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी विकत घेतलेले रंगीबेरंगी फुगे आकाशात सोडले आणि नवीन वर्षाचे उत्साहात स्वागत केलं. मित्र मैत्रिणींना सोशलमीडियावरून शुभेच्छा देण्यात आल्या. काहींनी ओल्या पार्टीचे नियोजन केले होते. हुल्लडबाजांवर अंकुश ठेवण्यासाठी पोलिसांनी चांगला बंदोबस्त ठेवलेला दिसून आला. देशभरातील विविध शहरांमध्ये तरुणाईने एकत्र येऊन नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील ट्विटरवरून देशवासियांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.