पुण्यात एलिअन दिसला, पंतप्रधान कार्यालयाला पत्र!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे | ‘मला परग्रहावरील माणूस (एलिअन) दिसला आणि तो माझ्याशी संवाद साधतो आहे’ अशी माहिती पुण्यातील एका व्यक्तीने पंतप्रधान कार्यालयाला इ – मेल द्वारा कळवली आहे. यानंतर पंतप्रधान कार्यालयाने ही माहिती राज्य सरकारकडे पाठवून तपास करण्याची सूचना केली. पुणे आणि परिसरात एलिअन दिसल्याच्या या बातमीमुळे एकच खळबळ उडाली आहे.

हाती आलेल्या माहिती नुसार, पुण्यातील एका व्यक्तीला रात्रीच्या वेळी घराबाहेरील झाडींत मोठा प्रकाश दिसला. ती परग्रहावरील व्यक्ती होती असे त्याचे म्हणणे आहे. ‘घराच्या खिडकीतून एलियनसारखा दिसणारी कोणीतरी व्यक्ती माझ्याशी संवाद करते आहे’ असे पंतप्रधान कार्यालयाला पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे. हे सर्व त्याने पत्रात कळवल्यानंतर पंतप्रधान कार्यालयाने राज्य सरकारला याप्रकरणाची चौकशी करण्याची सूचना केली.

मात्र सिंहगड पोलीसांनी याबाबत तपास केला असता इ-मेल पाठवणारी ४७ वर्षीय व्यक्ती मानसिक आजाराने ग्रस्त असल्याचे समोर आले. हे सर्व त्याच्या मनाचे खेळ होते आणि घराच्या खिडकित परग्रहवासी येऊन तो त्याच्या ग्रहाबद्दलची काही महत्वाची माहिती सांगतो आहे’ असा भास त्याला होत होता.

दिवसभराच्या ताज्या घडामोडी आणि  हटके लेख घरबसल्या मोफत मिळवण्यासाठी  आजच आमचा  WhatsApp  ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.

WhatsApp Group – 9890324729

Facebook Page – Hello Maharashtra

Leave a Comment