पुण्यात ‘या’ ठिकाणी मिळणार शिवभोजन थाळी; जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे महानगरपालिकेतील उपहारगृहात अजित पवार यांच्या हस्ते या योजनेचा शुभारंभ झाला. मुंजाजी मारोतराव भाकरे यांना पहिल्या शिवभोजन थाळीचा लाभ देत या योजनेचा शुभारंभ झाला. यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, आ. चेतन तुपे, महापालिका आयुक्त शेखर गायकवाड, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, अतिरिक्त आयुक्त राजेंद्र मुठे तसेच आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते

???? भोजनात काय मिळेल?

▪ दोन चपात्या,
▪ एक वाटी भाजी,
▪ एक वाटी वरण,
▪ भात

???? या ठिकाणी ही योजना सुरू करण्यात आली आहे

▪ हडपसर गाडीतळ- शिवसमर्थ भोजनालय,
▪ कात्रज बसस्थानक- कात्रज केंद्र,
▪ स्वारगेट बसस्थानक- स्वारगेट बसस्थानक कँटीन,
▪ मार्केटयार्ड गुलटेकडी- हॉटेल समाधान गाळा नं 11,
▪ कौटुंबिक न्यायालय शिवाजीनगर- कौटुंबिक न्यायालय कॅटीन,
▪ महानगरपालिका भवन- हॉटेल निशिगंधा,
▪ पिंपरी चिंचवड महानगर पालिका- कॅटीन,
▪ महात्मा फुले मंडई- अनिल स्नॅक्स सेंटर,
▪ यशवंतराव चव्हाण रूग्णालय पिंपरी- कॅटीन,
▪ वल्लभनगर बसस्थानक पिंपरी- कॅटीन,
▪ पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण- कॅटीन

या थाळीचा वापर गरजू गरीब नागरिकांसाठी व्हावा अशी अपेक्षा आहे. पहिल्या टप्प्यात पुणे महानगरपालिका क्षेत्रात 7 ठिकाणी एक हजार थाळी व पिंपरी चिंचवड महानगर पालिका 4 ठिकाणी 500 थाळीचे नियोजन प्रशासनाने केले आहे. या योजनेअंतर्गत जेवण घेणाऱ्याचे छायाचित्र, नाव आणि मोबाइल क्रमांक घेण्यात येणार आहे. त्यासाठी चालकाला शासनाकडून ‘महा अन्नपूर्णा ’ हे ऍप उपलब्ध करून देण्यात आले आहे. या भोजनालयातून दुपारी बारा ते दोन या कालावधीतच शिव भोजन थाळी मिळणार आहे.