कोल्हापूर/ प्रतिनिधी– ‘महाटेक २०२०’ प्रदर्शनाची ६ फेब्रुवारीपासून पुण्यातील कृषी महाविद्यालय पटांगण सुरुवात होणार आहे. चार दिवसीय औद्योगिक प्रदर्शनात ३०० पेक्षा जास्त कंपन्या सहभागी होणार असून, भारत व भारता बाहेरील जवळपास ५० हजारहून अधिक उद्योजक भेट देणार आहेत. विशेष विशेष म्हणजे कोल्हापूर मधील इंडो स्पार्क कन्स्ट्रक्शन सर्विसेस आणि अनंता या प्रतिष्ठित कंपन्याचा महाटेक २०२० सहभाग आहे.
गौरी मराठे म्हणाल्या की, या प्रदर्शन उद्घाटन प्रसंगी राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील ,मराठा चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष प्रदीप भार्गव, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ हे प्रमुख उपस्थित रहाणार आहेत. महाटेक- २०२० प्रदर्शकांच्या प्रतिक्रिया आणि प्रेक्षकांच्या प्रतिसादामुळे आम्हाला मोठ्या प्रमाणात यश मिळाले आहे त्यामुळे या वर्षीचे महाटेक हे अधिक चांगले व भव्य असेल. दरवर्षी आमचे लक्ष आमच्या प्रदर्शकांना त्यांनी वर्षभरात विकसित केलेल्या नाविन्यपूर्ण उत्पादनांचे प्रदर्शन बाजारपेठेत प्रक्षेपित करण्यासाठी सर्वोत्तम व्यासपीठ उपलब्ध करून देण्यावर असतो.
विनय मराठे म्हणाले की, महाटेक ने अनेक वर्षापासून पुण्यातील उत्पादनाच्या क्षेत्रात एक वेगळा ठसा उमटवला आहे. महाराष्ट्रातील अनेक प्रमुख कंपन्या महाटेक प्रदर्शनात सहभागी झाल्या आहेत. महाटेकचे मूळ उद्दीष्ट, उत्पादन क्षेत्राचा प्रसार करणे आणि योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देणे तसेच आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदिजींचे व्हिजन ‘मेक इन इंडिया’ला पाठींबा देणे हा आहे. प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही प्रदर्शनासह एसएमईसाठी ४ वेगवेगळ्या परिषदेचे आयोजन देखील केले आहे.