पोळा सणाच्या दिवशी बैलांना आंघोळ घालण्यासाठी गेलेले दोन जण बुडाले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अकोला प्रतिनिधी | अकोला जिल्ह्यात पोळा सणाच्या दिवशी नदीवर गेलेल्या दोघे जण वाहून गेल्याच्या घटना समोर आल्या आहेत. पोळा सणानिमित्त बैलांना आंघोळ घालण्यासाठी पूर्णा नदीत गेलेला तरुण पाण्याच्या जोरदार प्रवाहात वाहून गेल्याची घटना अकोला जिल्ह्यातील नया अंदुरा येथे आज शुक्रवारी सकाळी घडली. मंगेश गावंडे असं वाहून गेलेल्या तरुणाच नाव असून, त्याचा शोध घेण्यासाठी यंत्रणा कामाला लागली आहे. तर तेल्हारा तालुक्यातील विद्रुपा नदीतही १५ वर्षीय मुलगा वाहून गेला असल्याची माहिती समोर आली.

या घटनांबाबत सविस्तर माहिती अशी कि, नया अंदुरा येथील मंगेश गावंडे हा तरुण आज शुक्रवारी सकाळी बैलांना आंघोळ घालण्यासाठी पूर्णा नदीवर गेला होता. सध्या पूर्णा नदी दुथडी भरून वाहत आहे. नदीत उतरल्यावर पाण्याचा प्रवाहाचा अंदाज न आल्यान मंगेश गावंडे हा पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला. मंगेश नदीत वाहून गेल्याची माहिती गावकऱ्यांना कळताच ग्रामस्थांनी नदीकाठावर धाव घेऊन व त्याचा शोध सुरू केला.

यावेळी तलाठी सतीश कराड व कोतवाल राजु डांबेराव यांनी घटनास्थळावर धाव घेऊन शोध मोहिमेसाठी सहकार्य केले. नया अंदुरा येथील ग्रामस्थ नदीपात्रात उतरून मंगेशचा शोध घेतायेत. तर दुसरीकडं तेल्हारा तालुक्यातील विद्रुपा नदीवर बैलांना अंघोळ घालण्यासाठी गेलेला नववीत शिकणारा शाम देवानंद तायडे हा शाळकरी मुलगा डोहात बुडाला.

Leave a Comment