प्रकाश आंबेडकर गोपीचंद पडळकरांवर फिदा, सांगलीचा उमेदवार बदलणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे
धनगर समाजामध्ये सध्या सर्वाधिक लोकप्रिय असलेले तरूण नेते गोपीचंद पडळकर यांना वंचित बहुजन आघाडीचे तिकीट देण्याबाबत तत्वतः निर्णय घेण्यात आला आहे. अद्यापही पाडळकरांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झालेला नाही. सांगली लोकसभा मतदारसंघातून संजयकाका पाटील व विशाल पाटील या दोघांशी पडळकर लढत देतील.
 उमेदवारी बाबतचा अंतिम निर्णय घेण्यासाठी गोपीचंद पडळकर हेलिकॉप्टरने नागपूरमध्ये दाखल झाले. वंचित बहुजन आघाडीने सांगलीचे तिकिट जयसिंगतात्या शेंडगे यांना दिले होते. हे तिकिट रद्द करून प्रकाश शेंडगे यांना देण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. पण आता आयत्या वेळी पडळकर यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
 वंचित बहुजन आघाडीने यापूर्वीच पडळकर यांना उमेदवारीची ऑफर दिली होती. पडळकर यांनी वंचित बहुजन आघाडीमधून निवडणूक लढवावी असे आवाहन आघाडीच्या नेत्यांनी जाहीर व्यासपीठावरून केले होते. पडळकर शेट्टी यांच्या भरवशावर अवलंबून राहिले. पण शेट्टी यांनी आयत्या वेळी पडळकर यांना डावलून विशाल पाटीलांना तिकिट दिले. त्यानंतर पडळकरांनी अपक्ष निवडणूक लढविण्याची घोषणा केली.
सांगलीतील धनगर समाजाचे कार्यकर्ते तसेच आंबेडकरांचे कार्यकर्त्यांनी पडळकर यांच्या उमेदवारीला अधिक पसंती दिली आहे. कार्यकर्त्यांकडून आलेले मत गृहीत धरून प्रकाश आंबेडकर यांनी पडळकर यांना तिकिट देण्याचा निर्णय घेतला आहे. पडळकरांच्या प्रवेशामुळे प्रकाश आंबेडकर यांची सोलापूरमधील ताकद वाढण्यासही मदत होणार आहे. सांगली व सोलापूर हे गोपीचंद पडळकर यांचे होम पीच आहे. त्यांची या दोन्ही जिल्हयात मोठी ताकद आहे. या ताकदीचा फायदा आंबेडकरांना होईल असे सांगण्यात आले आहे.
Attachments area

Leave a Comment