पुणे प्रतिनिधी | स्वप्निल हिंगे
पुणे – मुंबई दरम्यान दररोज धावाणाऱ्या प्रगती एक्सप्रेसचे रुप बदलून नवीन केले असून या नव्या रुपासह ही गाडी ४ नोव्हेंबर पासून धावणार आहे. जुने डब्बे सजवून गाडीचा रंग पूर्णतः बदलण्यात आला आहे. तसेच महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख जपून पर्यटनस्थळ यांच्या छायाचित्रांचा समावेश करण्यात आला आहे .
दोन्ही आसनांमध्ये ‘रेड कार्पेट’, नेत्रहीन प्रवाशांच्या सुविधेसाठी ब्रेल लिपीत आसनांवर क्रमांक टाकण्यात आले आहे. नवीन रुपासह प्रगती एक्सप्रेस ४ नोव्हेंबर ला पुण्यातुन सकाळी ७:५० ला सोडण्या येणार आहे. खासदार अनिल शिरोळे यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.