बाबांच्या 10 टक्के काम करता आलं तरी खूप : अमित ठाकरे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महराष्ट्र ऑनलाईन : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महाधिवेशन मुंबईत सुरु आहे. या अधिवेशनात राज पुत्र अमित ठाकरे यांना राजकारणात लाँच करण्यात आले आहे. अमित ठाकरे यांची पक्षाच्या नेतेपदी निवड झाल्यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. मला कुणाशीही स्पर्धा करायची नाही. सध्या तरी माझी स्पर्धा फक्त माझ्या वडिलांशी आहे. त्यांनी महाराष्ट्रासाठी केलेल्या कामाच्या 10 टक्के काम मला करता आलं तरी खूप आहे,’ अशी प्रतिक्रिया मनसेचे नवनिर्वाचित नेते अमित ठाकरे यांनी अधिवेशनात दिली.

हे ऐकून पायाखालची जमीन सरकली होती

नेतेपदी निवड झाल्यानंतर अमित यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ‘मी राजकारणात अधिकृतरित्या सक्रिय होणार आहे, हे मला कालपर्यंत माध्यमातूनच समजत होतं. काल संध्याकाळी पाच वाजता साहेबांनी मला याबद्दल कल्पना दिली. अधिवेशनात मला शिक्षणासंदर्भात ठराव मांडायचा आहे, असं त्यांनी सांगितलं. हे ऐकून पायाखालची जमीनच सरकली. रात्री एक वाजता झोपलो आणि तीन वाजता उठलो. विश्वास ठेवा, मला नीट झोपही लागली नाही. राज ठाकरेंचा मुलगा म्हणून माझ्याकडून लोकांच्या मोठ्या अपेक्षा असणार. विशेषत: भाषणाच्या बाबतीत. त्याचा दबाव आला होता,’ अशी कबुली अमित यांनी दिली.

मुंबईत गोरेगाव येथे मनसेचे महाधिवेशन सुरु आहे. आज सकाळी मनसेच्या नवीन झेंड्याचे राज ठाकरे यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. आज संध्याकाळी ६ वाजता मनसे प्रमुख राज ठाकरे अकार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत.

ताज्या बातम्या थेट तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आजच आमच्या 8080944419 या नंबरवर Whatsapp करा आणि लिहा ”Hello News”

 

Leave a Comment