बीड,प्रतिनिधी, प्रतिनिधी : जिल्हा परिषदेच्या विषय समित्या घोषीत केल्यानंतर त्याचे तीन खातेवाटप झालेले नव्हते. आज दि. ६ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात खात्याचे वाटप करण्यात आले. यामधे बांधकाम आणि अर्थ जयसिंग सोळंके, शिक्षण आणि आरोग्य बजरंग सोनवणे तर कृषी आणि पशुसंवर्धन सविता मस्के यांच्याकडे देण्यात आले. खातेवाटपावरुन राष्ट्रवादीमध्ये वाद विवाद सुरु होते. मात्र या वादावर आज पडदा पडला.
जिल्हा परिषदेच्या विषय समित्या निवडण्यात आल्या होते. त्यातील तीन खात्याचे वाटप झालेले नव्हते. बांधकाम खात नेमक कुणाकडे जाणार या बाबत राष्ट्रवादीत वाद-विवाद सुरु होते. आज दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष बैठकीमध्ये खातेवाटपाची प्रक्रिया पूर्ण झाली. त्यामध्ये माजलगाव येथील जयंसिंह सोळंके यांच्याकडे महत्वाचं असलेले बांधकाम आणि अर्थ खात देण्यात आला आहे. उपाध्यक्ष असेलेल बजंरग बप्पा सोनवणे यांच्याकडे शिक्षण आणि आरोग्य खात देण्यात आलं. तर सविता मस्के यांच्याकडे कृषी आणि पशुसंवर्धन देण्यात आलं. आहे. यावेळी माजलगावचे आ. प्रकाश सोळंके जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सिरसट यांच्याहस आदिंची उपस्थिीती होती.