भाजपकडून कोल्हापुरातील कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्यांचा सत्कार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोल्हापूर, प्रतिनिधी, सतेज औंधकर – पुणे-बंगळूर महामार्गावर किणी टोल नाक्यावर दिनांक २८ रोजी कोल्हापूर पोलिस आणि राजस्थानमधील कुख्यात बिष्णोई गुंडांच्या टोळीमध्ये चकमक झाली. राजस्थानी टोळीतील गुंडांनी पोलिसांच्यावर प्राणघातक हल्ला केला याला प्रत्युत्तर देत कोल्हापूर जिल्हा पोलिसांनी धैर्याने आणि शिताफीने आपल्या जीवाची पर्वा न करता या टोळीतील तिघा कुख्यात गुंडांना पकडले. या कोल्हापूर पोलिस दलाच्या धाडसी कामगिरीबद्दल भारतीय जनता पार्टी कोल्हापूरच्यावतीने आज त्यांचा सत्कार करण्यात आला. भाजपा जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे यांनी जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ.अभिनव देशमुख यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. भाजपा प्रमुख पदाधिका-यांच्या हस्ते या धाडसी कारवाई मध्ये सहभागी असणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांचा सत्कार गुलाबपुष्प व कॅप्टन लक्ष्मी सेहगल यांचे पुस्तक भेट देऊन सत्कार करण्यात आला.

भाजपा जिल्हा उपाध्यक्ष हेमंत आराध्ये आपल्या प्रास्ताविकात म्हणाले, जी कारवाई राजस्थान आणि कर्नाटक पोलिस दल करू शकले नाही ती कारवाई कोल्हापूर पोलिस दलाने धाडसाने पूर्ण करून कुख्यात गुंडांना जेरबंद केले याचा आम्हाला अभिमान असल्याचे नमूद केले.

एल.सी.बी.विभाग प्रमुख तानाजी सावंत यांनी या धाडसी कामगिरीची माहिती सांगितली. त्याचबरोबर या सर्व मोहिमेसाठी जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ.अभिनव देशमुख यांचे प्रमुख मार्गदर्शन असल्याचे नमूद केले. अशा कारवाई प्रसंगी पोलिस अधिकाऱ्यांना नैतिक समर्थन देण्याचे कार्य पोलिस अधिक्षक डॉ.अभिनव देशमुख हे सातत्याने करत असतात यामुळे पोलिसांचे मनोबल वाढण्यास मदत होते असेही तानाजी सावंत यांनी नमूद केले.

जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे म्हणाले, डॉ.अभिनव देशमुख यांनी सदरची कारवाई आपल्या सर्व सहकाऱ्यांच्या साथीने मिळालेल्या अत्यंत अल्प वेळेत पूर्ण सर्तकतेने राबवल्या बद्दल प्रथम सर्वाचे अभिनंदन केले त्याचबरोबर कोल्हापूर पोलिस दलाला त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. कोल्हापूर जिल्ह्याला डॉ.अभिनव देशमुख यांच्या रूपाने संयमी, धैर्यवान आणि कर्तव्यनिष्ठ पोलिस अधिक्षक लाभल्याने कोल्हापूर जिल्ह्यात शांतता व सैहार्दाचे वातावरण राहण्यास मदत होत असल्याचे भाष्य केले.

यावेळी सरचिटणीस दिलीप मेत्राणी, सुभाष रामुगडे, उपाध्यक्ष गणेश देसाई, चंद्रकांत घाटगे, प्रवीणसिंह शिंदे, मंडल अध्यक्ष डॉ.सदानंद राजवर्धन, संतोष माळी, भरत काळे, रविंद्र मुतगी, प्रदीप पंडे, अमोल पालोजी, गायत्री राऊत, नजीर देसाई, मुसाभाई कुलकर्णी, विजय आगरवाल, अनिरुद्ध कोल्हापूरे, प्रसाद मुजुमदार, प्रदीप उलपे, सचिन जाधव, गिरीष साळोखे, इकबाल हकीम, संजय जासूद, मनोज इंगळे, किसनराव खोत, अरविंद वडगांवकर, अक्षय निरोखेकर, रोहित कारंडे, आदींसह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Comment