भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यात पतंगाचे आगमन; डेव्हिड वॉर्नरने पकडला पतंग, पहा व्हिडीओ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

टीम हॅलो महाराष्ट्र : मकर संक्रांतीचा सण देशात साजरा होत आहे. हा सण क्रिकेटच्या मैदानात म्हणजे ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यामध्ये सुरु असलेल्या एकदिवसीय सामन्यातही पहायला मिळाला. होय, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या जाणार्‍या पहिल्या वनडे सामन्यात पतंगाचे थेट मैदानावरच आगमन झाले. पतंग मैदानावर पडल्याने हा सामना थोड्यावेळेसाठी थांबवावा लागला. मकर संक्रांती उत्सवात पतंग उडवण्याचा ट्रेंड आहे, त्याची एक झलक मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये पाहायला मिळाली.

 

थेट मॅचमध्ये पतंगाचा लूक दिसणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने पतंग पकडला आणि पंचांना दिला.

याशिवाय आयसीसीने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर एक फोटोही शेअर केला आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, पतंगामुळे खेळ थांबला! आपण यापूर्वी असे काही पाहिले आहे का? या फोटोमध्ये वॉर्नरने पतंग पकडला आहे.

 

Leave a Comment