हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। व्यसनाच्या आहारी गेलेला व्यक्ती नशेसाठी काहीही करताना अनेकदा पाहायला मिळते. माणसांनी दारू किंवा गांजाची चोरी केल्याचे बऱ्याचदा कानावर पडत असते. पण कधी प्राण्यांनी या प्रकारची चोरी केल्याचे आपण ऐकले अथवा पाहिले नाही. पण अशी एक घटना समोर आली आहे ज्यामध्ये एका उंदराने गांजाच्या शेतावर डल्ला मारला आहे. आपण उंदराने धान्य चोरल्याचे, खाद्यपदार्थ पळवून नेल्याचे पहिले आहे. पण ही एक वेगळीच घटना घडली आहे. कोलीन सुलिवान यांनी आपल्या फेसबुक अकॉउंटवरून ही घटना शेअर केली आहे. ज्यामध्ये उंदराने गांजा पळवून नेल्याचा प्रकार उघड झाला आहे.
कॅनडा इथे एका तरुणाच्या गांजाच्या शेतात उंदराने घुसखोरी केली आणि खाण्यास सुरुवात केली. हा उंदीर शेतातलं पिकं खाऊन पळ काढायचा त्यामुळे या पिकाची नासाडी कोण करतं हे सुरुवातीला कळत नव्हतं मात्र एक दिवस हा उंदीर पकडला गेला. कोलिन यांनी फेसबुकवर या उंदराचे गांजाची पानं खाताना फोटो शेअर केले आहेत. हा उंदीर त्यांची गाजांची झाडं चोरी करून घेऊन जात असल्याचं त्यांनी या पोस्टमध्ये लिहिलं आहे. जोपर्यंत तो बेशुद्ध होत नाही तोपर्यंत त्याचा हा दिनक्रम सुरू होता. मात्र एक दिवस अतिरेक झाला आणि तो बेशुद्ध पडला.
या उंदरानं खूप जास्त गांजाची पानं खाल्ल्यामुळे अशी अवस्था झाल्याचं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे. या उंदराला गांजा चढल्यानं त्याची शुद्ध हरपली आणि तो उताणा पडला. सुरुवातीला या उंदारावर कोणताच परिणाम झाल्याचं दिसून आलं नाही. पण एक दिवस त्यानं अति केल्यामुळे तो बेशुद्ध पडला. त्यांनी या उंदराला पकडून जंगलात सोडण्याचा निर्णय घेतला मात्र नशेची सवय झालेला उंदीच थोडीच ऐकणार होता तो परत त्या शेतात आला. व्यसन मग माणसाला असो किंवा प्राण्याला ते वाईटच हे मात्र सिद्ध झाले आहे. सध्या सोशल मीडियावर कोलिन यांची ही पोस्ट वाचून अनेक जण अवाक झाले आहेत.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’