मराठा आरक्षणाप्रश्नी राज्यातील सर्वपक्षीय खासदारांनी पंतप्रधान मोदींना एकत्रितपणे निवेदन द्यावे- खा. संभाजीराजे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोल्हापूर । सुप्रीम कोर्टाने स्थगित केलेल्या मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्रातील सर्वपक्षीय खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एकत्रितपणे निवेदन द्यावे, असे आवाहन खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी केले आहे. संभाजीराजेंनी यासंदर्भात सर्व खासदारांना उद्देशून एक पत्र लिहले आहे. यामध्ये राज्यातील सर्व खासदारांनी मिळून एकजुटीने आरक्षण प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणे अत्यावश्यक आहे. आपण जो ठरवाल त्यांच्या नेतृत्वात आपण पंतप्रधानांची भेट घेऊन हा मुद्दा मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करू, असे संभाजीराजे यांनी म्हटले.

याशिवाय सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाला स्थगिती देत हा खटला घटनापीठाकडे पाठवला असला तरी शैक्षणिक आणि नोकर भरतीमधील आरक्षणाला स्थगिती दिली आहे. दुसऱ्या राज्यातील ५० टक्क्यांपेक्षा जास्त असलेल्या आरक्षणाला अशाप्रकारे स्थगिती दिली गेली नसल्याचे दिसून येते. उदा. तामिळनाडू मधील आरक्षण प्रश्नांचा सुद्धा अजून निकाल लागला नाही, तरी तेथील राज्याने दिलेले आरक्षण चालू असं संभाराजे यांनी पत्रात नमूद केलं आहे.

केंद्राने आर्थिकदृष्ट्या मागास वर्गाला १० टक्के आरक्षण दिले आहे. तेदेखील न्यायालयात आले आहे. परंतु केंद्र सरकारच्या शैक्षणिक आणि नोकर भरतीला स्थगिती देण्यात आलेली नाही. म्हणून मराठा आरक्षणाला न्यायालयाने जी स्थगिती दिली आहे, ती उठवण्यात आली पाहिजे, अशी मागणी खासदार संभाजीराजे यांनी केली.आपण मराठा आरक्षणासाठी काही हालचाल केली नाही तर आजपर्यंत सर्वच राजकरीय पक्षाच्या नेत्यांनी आपली दिशाभूल केली, असा समज मराठा समाजात पसरेल. हा गैरसमज दूर करण्याची वेळ आल्याचेही संभाजीराजे यांनी पत्रात म्हटले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment