महसूली तूट भरून काढण्यासाठी श्रीमंतांवर COVID उपकर लावा! कुमारस्वामी यांची मागणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

वृत्तसंस्था । कोरोना व्हायरसमुळे सध्या संपूर्ण देशात लॉकडाउन लागू आहे. लॉकडाउनमध्ये सर्व उद्योग-व्यवसाय बंद असल्यामुळे राज्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. कर रुपाने महसूल जमा होत नसल्याने अनेक राज्यांच्या तिजोऱ्या रिकाम्या होत चालल्या आहेत. लॉकडाऊनमुळे राज्याचे महसुलाचे सर्व स्रोत बंद आहेत. सध्या देशात लॉकडाउनचा दुसरा टप्पा सुरु आहे. पण अजूनही करोना व्हायरसवर नियंत्रण मिळवता आलेले नाही. त्यामुळे काही राज्यांमध्ये लॉकडाउनचा कालावधी आणखी वाढू शकतो.

या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकाचे माजी मुख्यमंत्री आणि जनता दल सेक्युलरचे नेते एच.डी.कुमारस्वामी यांनी “लॉकडाउनमुळे झालेले आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी श्रीमंतांवर COVID-19 उपकर लावा” अशी मागणी केली आहे. याबाबतचे वृत्त पीटीआयने आपल्या ट्विटर हॅण्डलवरून दिले आहे.

देशातील लॉकडाऊन कधी संपेल याच उत्तर सध्या कोणीही देऊ शकत नाही. अशा वेळी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी नाईलाजाने लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे राज्ये मोठ्या सध्या आर्थिक संकटात सापडली आहेत. सर्व आर्थिक व्यवहार ठप्प असल्याने येणाऱ्या काळात पैशाविना राज्याचा गाडा कसा चालवायचा हा प्रश्न आ वासून राज्य सरकारांपुढे उभा आहे. म्हणूनच ज्यांच्याकडे ज्यादा संपत्ती आहे त्यांच्यावर कर लावावा अशी सूचना कुमारस्वामी यांनी केली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

Leave a Comment