पुणे | सुनिल शेवरे
संपूर्ण शहरात ठीकठिकाणी पाणी कपाती चा निर्णय पालिकेने घेतल्याने सर्व पक्ष आक्रमक झालेले दिसून येत आहेत. परवा पालकमंत्री गिरीश बापट यांना घेराव घालण्यात आला होता. पाण्याचा प्रश्नी राष्ट्रवादी महिला आक्रमक झाल्याचे दिसून आले. महापालिकेच्या सभागृहात हंडा घेऊन या महिलांनी गारहाणी मांडली.
इतर विरोधी पक्षातील सदस्यांनी देखील या आंदोलनाला पाठिंबा दिला. यावेळी नंदा लोणकर सह राष्ट्रवादीच सर्व नगरसेवक उपस्थित होते.