महापुराचा फायदा घेत घरफोड्या करणाऱ्या टोळीला अटक; संशयिताकडून ११ गुन्ह्याची कबुली

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोल्हापूर प्रतिनिधी । पूरपरिस्थितीत पूरग्रस्त भागातील बंद घरांना टार्गेट करून ११ घरफोड्या करणाऱ्या संशयिताना करवीर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आकाश रघुनाथा चव्हाण (वय.२७ रा. मूळ कोते, सध्या रा. वडणगे ता. करवीर) योगेश बाबुराव संकपाळ (वय.३१ रा. लोणार वसाहत, उचगाव) आणि धोंडीराम उर्फ रामा रंगराव पाटील (वय.३३ रा. वडणगे ता. करवीर ) अशी त्याची नावे आहेत. संशयित आरोपींकडून सोन्या चांदीचे दागिने आणि इतर साहित्य असा सहा लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला,असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख यांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वडणगे येथील जौदाळ मळा परिसरात ६ ते १० ऑगस्ट दरम्यान पुराचे पाणी आले होते. या कालावधीत याठिकाणी राहत असलेले विनोद प्रसाद जौदाळ यांचे कुटुंबीय आणि शेजारील नागरिक नातेवाईकांच्या घरी राहण्यासाठी गेले होते. दरम्यान जौदाळ यांचा आणि शेजारील नागरिकांचा बंद घराचा दरवाजा तोडून, संशयित चोरटे धोंडीराम पाटील,आकाश चव्हाण आणि योगेश संकपाळ यांनी लोखंडी तिजोरीतील सात तोळे अडीच ग्रॅम वजनाचे सोने लंपास केले होते. या गुन्ह्यात त्यांना करवीर पोलिसांनी अटक केली होती. अधिक तपासात संशयित चोरट्यानी

करवीर पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडणगे येथे सहा चिखली येथे एक शिंगणापूर, नागदेववाडी,फुलेवाडी रिंगरोड, पिरवाडी क्रांतिसिंह नानापाटील नगर, आर.के नगर भागात घरफोडी केल्याची कबुली दिली. तसेच राधानगरी भागातील कोते गावातील मंदिरात चोरी, दूध डेअरी, मोटारसायकल आणि घरफोडी संशयितानी केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

संशयिताकडून एकोणीस तोळ्यांचे सोन्याचे, चांदीचे दागिने देव देवतांच्या पितळेच्या मुर्त्या व कॉम्प्युटर आणि मोटारसायकल असा एकूण सहा लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केले आहे. सदरची कारवाई पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्यामार्गदर्शनाखाली,उपनिरीक्षक विवेकानंद राळेभात,प्रशांत माने, राजू जरळी,दीपक घोरपडे, गुरू झाम्बरे, सुहास पाटील, युक्ती ठोंबरे, राम माळी,सचिन बेंडखळे यांनी केली आहे.संशयिताकडून आणखीन गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असून, अधीक तपास पोलीस करत आहेत.

इतर आणखी बातम्या-

 

Leave a Comment