माझं कुटुंब माझी जबाबदारी या मोहीमेत सामील व्हा ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं आवाहन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (13 सप्टेंबर) दुपारी 1 वाजता महाराष्ट्रातील जनतेला संबोधित केलं आहे. मोठ्या कालावधीनंतर मुख्यमंत्री व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून जनतेला संबोधित केलं. उद्धव ठाकरे नक्की कोणती घोषणा करणार, तसेच कोणतं मार्गदर्शन करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.जाणून घेऊया उद्धव ठाकरे यांच्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंग मधील काही ठळक मुद्दे

१]विधीमंडळातील सर्व पक्षांनी मराठा आरक्षणासाठी एकमताने निर्णय घेतला, उच्च न्यायालयात आव्हान जिंकलो, पहिल्या सरकारचे वकील बदलले नाहीत, नवे वकीलही नियुक्त, कोर्टात कमी पडलो नाही

२]शेतकरी वर्क फ्रॉम होम करु शकत नाहीत, जे विकेल तेच पिकेल, कोणत्या पिकाला कुठे बाजारपेठ आहे, याचा अभ्यास कृषी मंत्रालय करुन शेतकऱ्यांना बियाणे देऊ

३]डिसेंबर-जानेवारीमध्ये कोरोनावर लस येईल अशी अपेक्षा, आवश्यकता नसेल तर घराबाहेर जाऊ नका, मास्क काढून गर्दीत फिरु नका, अंतर ठेवा, हात सतत धुवा, हीच विषाणूपासून लांब राहण्याची त्रिसूत्री

४]WHO ने पुढच्या भीषण संकटाची नांदी असल्याचे सांगितले आहे, येत्या 15 तारखेपासून एक महिनाभर नवी मोहीम, माझे कुटुंब माझी जबाबदारी, जात-पात-धर्म विसरुन महाराष्ट्रावर प्रेम करणारे सर्व यात सहभागी

५]कोरोना गेला म्हणजे पुन्हा राजकारण सुरु करण्याचे प्रयत्न, महाराष्ट्राच्या बदनामीबद्दल मुख्यमंत्रीपदाचा मास्क बाजूला काढून नक्की बोलणार

६]मिशन बिगीन अगेन अंतर्गत हळूहळू उपस्थिती वाढवत आहोत, पण कोरोना, पावसाळा आणि सण उत्सव एकत्र, कोरोनाचे संकट वाढत आहे, जगात दुसरी लाट येण्याची शक्यता, मुंबईसह ग्रामीण भागातही कोरोना पसरतोय

७]बंद जागेत भेटणे टाळा, एसीचा वापर कमी करा, पुन्हा लॉकडाऊन करण्याची वेळ येऊ देऊ नका : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

८]ऑनलाईन खरेदीवर भर द्या, सार्वजनिक वाहतुकीत बोलू नका, कोणाकोणाला भेटलात याची यादी बनवत राहा, एकत्र जेवताना समोरासमोर बसू नका, जिम-रेस्टॉरंट मालकांनी सूचना पाळाव्या, आपण सुरु करु

९]राज्यातील 12 कोटी जनतेची चाचणी अशक्यप्राय, प्रत्येक घरात आरोग्याची चौकशी करायला दोन वेळा टीम जाईल, प्रत्येक लोकप्रतिनिधीने जबाबदारी घ्यावी, 50-55 वर्षावरील व्यक्तीची ऑक्सिजन मात्रा आणि व्याधीची माहिती घ्या

१०]सर्वधर्मीयांनी आपापले सण-उत्सव साजरे करताना संयम पाळला, त्याबद्दल आभार

११]भारत हा कृषिप्रधान देश.त्यामुळे आपल्या देशातील शेतकरी अभिमानाने जगला पाहिजे.

Leave a Comment