मुंबई प्रतिनिधी |राज्यात राजकीय घडामोडी वेगाने सुरू आहेत. शिवसेनेकडे नेतृत्व देऊन राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस तयार असल्याचे समजते. तर शिवसेनेच्या नेतृत्वाखाली सरकारला काँग्रेसने बाहेरून पाठिंबा द्यावा, यासाठी राष्ट्रवादी प्रयत्न करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. परंतु या भेटीनंतर शरद पवार यांच्या झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी या शक्यता फेटाळून लावल्या आहेत.
या वेळी बोलताना शरद पवार म्हणाले कि संजय राऊत हे माझ्याकडे कुठलाही प्रस्थाव घेऊन आले नव्हते. तसेच महाल जनतेने विरोधी पक्षात बसण्याचा कौल दिला असल्याने आम्ही सक्षम विरोधी पक्ष म्हणूनच काम करणार आहोत. तसेच भाजप सेनेनं लवकरात लवकर सरकार स्थापन करून आमहाला देखील काम करण्याची संधी उपलब्ध करून द्यावी. राज्यातील विधानसभेची मुदत संपण्यास दोनच दिवस बाकी असल्याने या पत्रकार परिषदेत पवार काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. परंतु आज देखील पवारांनी गुगली टाकत सस्पेन्स वाढवला आहे.
या वेळी एका पत्रकारांनी विचारले कि बहुमत असो किन्वा नसो अमित शहा सरकार स्थापन करतातच त्याबद्दल तुम्हाला काय वाटत यावर पवारांनी मिश्किल टिप्पणी करत त्यांनी सरकार स्थापन करावंच आम्ही देखील त्यांच्या कलेची वाट पाहत असल्याचे सांगितले. तसेच भाजपचे मंत्री राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होण्याबद्दल विधाने करत आहेत. त्यामागचा नेमका हेतू काय हे त्यांनाच माहित आसल्याचे पवार म्हणाले.
काँग्रेस ने जी भूमिका घेतली आहे तीच भूमिका आमची असणार असल्याचेही पवारांनी यावेळी स्पष्ट केलंय. त्यामुळे आता पुढील ४८ तासांत राज्यात काय होतंय हे अस्पष्टच आहे. परंतु पवारांनी जाहीर केलेल्या या भूमिकेमुळे शिवसेनेची मात्र चांगलीच गोची होत असल्याचं पाहायला मिळतंय हे नक्की…