मुंबई | कोकणातील खास खाद्यपदार्थांची चव आणि कोकणी ढंगाचे ग्रामीण जनजीवन जगण्याचा अनुभव मुंबईकरांना घेता येणार आहे. ‘कोकण भूमी प्रतिष्ठान’ तर्फे अर्नाळा येथे ८ व्या ‘ग्लोबल कोकण महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. यामुळे कोकणाचा अनुभव घेण्यासाठी कोसोदूर जाणार्यांना आता मुंबईतच कोकणी फिल मिळणार आहे.
पहिल्या टप्प्यात २२ ते ३१ डिसेंबर दरम्यान ‘व्हिलेज टुरिझम फेस्टिवल’ आयोजित करण्यात आला आहे. हा महोत्सव अर्नाळाला सुरु होऊन पुढील काही महिन्यात आंबिवली (पालघर), ऐनशेत (वाडा), चौल (रेवदंडा) येथे होणार आहे. निसर्ग जंगलभ्रमंती, बैलगाडीतून गाव फिरणे, भाषा, परंपरा, लोककला, मनसोक्त नदीत डुम्बणे, आबादुबी, लगोरी, वीटीदांडू, भोवरा असे अस्सल ग्रामिण खेळांचा आनंद घेता येईल. दुसऱ्या टप्प्यात हा महोत्सव ३ ते ६ जानेवारी नेस्को, गोरेगाव येथे आयोजित केला आहे.
एअर स्पोटर्सचा अनुभव
जगभर प्रसिद्ध असलेले एअर स्पोर्टस् पर्यटन या महोत्सवाच्या निमित्ताने अनुभवता येणार आहे. अर्नाळा बीचवर ही पर्यटन सुविधा सुरू केली आहे.
अॅग्रिकल्चर टुरिझम
‘मामाची वाडी’ नावाचे एक अॅग्रिकल्चर टुरिझमचे सेंटर विकसित करण्यात आले आहे. सोनचाफा, मोगरा, लिली, झेंडू, गुलाब अशा सर्व प्रकारच्या फुलांची बाग पाहायला मिळेल.