मुंबईतील नाईट लाईफला हिरवा कंदील; मंत्रिमंडळाची मंजुरी,२७ जानेवारीपासून अंमलबजावणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील नाईट लाइफविषयी मांडलेल्या प्रस्तवाला आज घेण्यात आलेल्या मंत्रिमंडळाने हिरवा कंदील दाखवण्यात आला.  प्रजासत्ताकदिनानंतर या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या निर्णयानुसार मुंबईतील हॉटेल्स, रेस्टॉरंट व दुकानं २४ तास सुरू राहणार आहेत. मात्र, पब आणि बारसाठी वेळेची मर्यादा पूर्वीप्रमाणेच कायम राहणार आहे.

गृहमंत्री अनिल देशमुख व आदित्य ठाकरे यांनी स्वत: या निर्णयाची माहिती दिली. नाइट लाइफमुळं पोलिसांवर कोणताही ताण येणार नाही. तसंच, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, असं देशमुख यांनी सांगितलं. नाइट लाइफ सुरू झाली तरी पब आणि बारला पूर्वीप्रमाणेच वेळेची मर्यादा राहील. पब आणि बार दीड वाजेपर्यंतच सुरू राहतील, असं त्यांनी स्पष्ट केलं.

Leave a Comment