मुंबई । दाक्षिणात्य कलाविश्वाचे सुपरस्टार मोहनलाल आज आपला ६० वा वाढदिवस साजरा करत आहेत. केरळमध्ये आपल्या कुटुंबासोबत त्यांनी आपला वाढदिवस वाढदिवस साजरा केला. शिवाय आपल्या जन्म दिवसाचे औचित्य साधत त्यांनी चाहत्यांना एक मोठी भेट दिली आहे. मोहनलाल यांनी आपल्या २०१३ साली प्रदर्शित झालेल्या ‘दृश्यम’ चित्रपटाच्या सिक्वलची घोषणा केली आहे. त्यांनी आपल्या ‘दृश्यम २’ चित्रपटाच्या टीझर प्रदर्शित केलं आहे. या चित्रपटाचा टीझर २० सेकेंदांचा आहे.
एंटनी पेरुमबवूर हे चित्रपटाची निर्मिती करणार आहेत तर दिग्दर्शक जेथु जोसफ यांच्या खांद्यावर चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी असणार आहे. मोहनलाल यांनी चित्रपटाचा टीझर ट्विटरच्या माध्यमातून प्रदर्शित केला आहे. सोशल मीडियावर हा टीझर सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ‘दृश्यम २’ चित्रपटामध्ये मोहनलाल जोर्गेकुटी ही व्यक्तीरेखा साकारताना दिसणार आहेत. आपल्या मुलीने केलेल्या खूणाचं रहस्य लपवण्याचे काम त्यांनी या चित्रपटात केले आहे. महत्वाचं म्हणजे सरकारकडून परवानगी मिळताच चित्रपटाची शुटिंग सुरू करण्यात येणार आहे.
#Drishyam #Drishyam2 pic.twitter.com/OHnue7P5uw
— Mohanlal (@Mohanlal) May 21, 2020
२०१३ साली मल्याळी भाषेत प्रदर्शित झालेल्या मोहनलाल यांचा ‘दृश्यम’ हा चित्रपट प्रचंड गाजला होता. या सिनेमाच्या गूढ, रंजक कथानकामुळे बॉलीवूडमध्ये निशिकांत कामत या दिग्दर्शकानं अजय देवगणला कास्ट करत ‘दृश्यम’ चित्रपटाचा हिंदी रिमेक बनवला होता. हा रिमेकला सुद्धा उत्तर भारतातील हिंदी पट्ट्यात प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. दरम्यान, या चित्रपटाचा सिक्वलची घोषणा झाल्यावर केवळ दक्षिण भारतच नव्हे तर उत्तर भारतात सुद्धा या चित्रपटाची उत्सुकता दर्शकांना लागली आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”