नवी दिल्लीः अॅपलची ओळख सध्या आयफोन बनवणाऱ्या कंपनीची होत असली तरी परंतु, या कंपनीची सुरवात कम्प्यूटरने झाली होती. अॅपले संस्थापक स्टीव जॉब्स यांनी १९७६ साली बनवलेल्या Apple-1 कम्प्यूटरचा या आठवड्यात बोस्टनमध्ये लिलाव करण्यात आला आहे. या कम्प्यूटरचे खास वैशिष्ट्ये म्हणजे १९७६ साली बनवलेला असूनही तो अद्याप सुरू आहे. त्यामुळे याला सर्वाधिक बोली लागली. या कम्प्यूटरला ४५८,७११ डॉलर म्हणजेच जवळपास ३.४ कोटी रुपयांची बोली लागली.
Apple-1 कम्प्यूटरच्या ब्रँडिंगसोबत तयार करण्यात आलेला हा पहिला कम्प्यूटर होता. अॅपलचे अॅड कॅम्पेनमध्ये सहभागी झालेली ‘think different’वॉचचा सुद्धा लिलाव करण्यात आला. या लिलावात १,३७५ डॉलर म्हणजेच जवळपास १ लाख रुपयांची बोली लागली. आरआर लिलावाचे व्हीपी बॉबी लिविंगस्टोन म्हणाले, Apple-1 केवळ कम्प्यूटिंगच्या जगाची सुरुवात नव्हती तर जगाचा तो हीरा होता. आज जगात सर्वात मोठी किंमत आणि यसश्वी कंपनीची सुरुवात पाहता येवू शकते. जवळपास २०० Apple-1 कम्प्यूटर बनवण्यात आले होते. त्यातील मेसर्स जॉब्स आणि वोजनिक यांनी बनवलेल्या १७५ ची विक्री करण्यात आली.
या लिलावात ठेवण्यात आलेली मशीनला वेस्टर्न मिशिगन कम्प्यूटर स्टोर सॉफ्टवेअर हाउस ने १९८० मध्ये एक नवीन आयबीएम मशीनची खरेदी केली होती. त्यानंतर Apple-1 ला स्टोरमध्ये कस्टम डिस्प्ले केसमध्ये ठेवण्यात आले होते. त्यानंतर ते कम्प्यूटर स्टोरमध्ये पोहोचले होते. या युनिटला गेल्यावर्षी Apple-1 एक्स्पर्ट कोरी कोहेनकडून रिस्टोर करण्यात आले होते. तसेच कॅलिफॉर्नियामध्ये २०१९ झालेल्या विंटेज कम्प्यूटर फेस्टिव्हलमध्ये ठेवण्यात आले होते.