‘या’ कारणामुळे उद्धव ठाकरें समोर वृद्ध शेतकरी ढसाढसा रडला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

लातूर प्रतिनिधी | शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे हे आज मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. अवकाळी पावसानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. या नुकसानीची व्यथा उद्धव ठाकरे यांच्या समोर मांडताना एका वृध्द शेतकऱ्याने हंबरडा फोडला. नांदेड जिल्ह्यातील कंधार मधल्या किरोळा इथं उद्धव ठाकरे हे बाधित पिकांची पाहणी करण्यासाठी गेले असता तिथे एका शेतकर्‍याने ठाकरे यांच्यासमोर ढसाढसा रडायला सुरवात केली.

‘साहेब.. आता कस वर्ष कटवावं आम्ही…कसे लेकरांचे लग्न करावेत.. साहेब.. कस काय करावं आता तुम्हीच सांगा.. काही करा पण आमचं संकट दूर करा असं म्हणत सदर शेतकऱ्याने ठाकरे यांच्यासमोर हंबरडा फोडला. ही विदारक परिस्थिती बघून साहजिकच उद्धव ठाकरे यांचे ही डोळे पाणावले असतील.

दरम्यान राज्यात परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष आणि लोकप्रतिनिधी राज्यभर दौरे करत असल्याचे पाहायला मिळत आहे. यावेळी उद्धव ठाकरे हे नुकसानीची पाहणी करण्यासाठी गेले असता हा प्रकार घडला.

Leave a Comment