येत्या 18 ते 22 सप्टेंबरला होणार संसदेचे विशेष अधिवेशन; मोदी सरकारची मोठी घोषणा 

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर आता मोदी सरकारकडून विशेष अधिवेशनाची (Special Session) घोषणा करण्यात आली आहे. येत्या 18 ते 22 सप्टेंबरदरम्यान मोदी सरकारचे हे विशेष अधिवेशन पार पडणार आहे.  विशेष अधिवेशन पाच दिवसांचे असून याबाबतची माहिती संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी (Prahlad Joshi) यांनी ट्विट करून दिली आहे. मोदी सरकारकडून घेण्यात येणाऱ्या या अधिवेशनामुळे आता सर्वांच्यात भुवया उंचावल्या आहेत.

मुख्य म्हणजे, विशेष अधिवेशनामध्ये नरेंद्र मोदी कोणत्या मोठ्या घोषणा करतील हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. या पाच दिवसाच्या विशेष अधिवेशनात विविध विषयांवर चर्चा होणार यावेळी 10 विधेयकं देखील मांडली जाण्याची शक्यता आहे. तसेच काही महत्त्वाच्या विधेयकांना मंजुरी देण्यात येईल. तसेच, या विशेष अधिवेशनात ५ महत्वाच्या बैठका होतील. त्यामुळे या बैठकीत मोदी सरकारकडून नेमके काय निर्णय घेण्यात येतील याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे.

दरम्यान, सध्या आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारने आपली खेळी खेळण्यास सुरुवात केली आहे. नुकती सरकारकडून घरगुती गॅसच्या किमतीत देखील दोनशे रुपयांची कपात करण्यात आली आहे. आगामी काळात मोदी सरकारकडून असे अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात येतील असे म्हटले जात आहे. आता यामध्ये मोदी सरकारचे विशेष अधिवेशन होणार असून त्याचा नेमका हेतू काय असेल हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.