राजकीय मतभेद असले तरी व्यक्तिगत पातळीवर सहकार्य; रोहित पवारांच्या अमित ठाकरेंना शुभेच्छा

0
102
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महराष्ट्र ऑनलाईन : महारष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महाअधिवेशनात राज पुत्र अमित ठाकरे यांचे राजकीय लौंचिंग झाले आहे.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेतेपदी अमित ठाकरे यांची निवड करण्यात आली आहे. यानंतर त्यांच्या राजकीय वाटचालीसाठी अमित ठाकरेंवर शुभेच्छाचा वर्षाव होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी देखील अमित ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या आहेत. राजकीय मतभेद असले तरी वैयक्तीक पातळीवर सहकार्य राहील, अशा शुभेच्छा रोहित पवार यांनी ट्विटरवरून दिल्या आहेत.

त्यांनी आपल्या शुभेच्छात लिहिले की, ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेने’च्या नेतेपदी निवड झाल्याबद्दल अमित राज ठाकरे यांचं हार्दिक अभिनंदन आणि त्यांना भावी कार्यासाठी शुभेच्छा. आमच्यात राजकीय मतभेद असले तरी जनतेच्या व राज्याच्या हितासाठी गरज असेल तिथे मित्र म्हणून व्यक्तीगत पातळीवर एकमेकांना कायमंच सहकार्य राहील.

अमित ठाकरे यांच्या राजकारणातील प्रवेशामुळे आणखी एका युवा नेत्याची महाराष्ट्राच्या राजकारणाची भर पडली आहे. आदित्य ठाकरे, रोहित पवार, धीरज देशमुख, ऋतुराज पाटील, अदिती तटकरे अशी राजकीय घराण्यांची पार्श्वभूमी असलेल्या नेत्यांच्या पाठोपाठ आता अमित ठाकरेही राजकीय मैदानात उतरले आहेत.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here