कोल्हापूर / प्रतिनिधी : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे आज विमानतळावर पालकमंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील यांनी राजर्षी शाहू गौरव ग्रंथ देवून स्वागत केले.
यावेळी उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष डॉ. योगेश जाधव, आमदार चंद्रकांत पाटील, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके, जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अजय माने यांनी पुष्पगुच्छ देवून राज्यपालांचे स्वागत केले.
पोलीस दलाच्यावतीने राज्यपालांना यावेळी मानवंदना देण्यात आली.