मुंबई : राज्यात पावसाने दमदार वापसी केल्यानंतर उद्या मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने वर्तवला आहे. हवामान खात्याने दिलेल्या मुसळधार पावसाच्या इशार्याने रेल्वे प्रशासनाने काही गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेतका आहे. रेल्वे प्रशासनाने पावसाचा अंदाज आणि रेल्वे ट्रेकवर साचलेले पाणी याचा विचार करून हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे उद्या रेल्वेने प्रवास करणार्या प्रवाशांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. तसेच रद्द झालेल्या गाड्यांमुळे इतर गाड्यांना गर्दी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आवश्यकता नसल्यास प्रवास उद्या प्रवास टाळण्याचे अावाहन रेल्वे प्रशासनाने नागरिकांना केले आहे. पुणे मुंबई प्रगती एक्सप्रेस, सिहगड एक्सप्रेस, मनमाड मुंबई राज्यराणी एक्सप्रेस, मनमाड गोदावरी एक्सप्रेस ह्या गाड्या उद्या सुटणार नाहीत असे रेल्वे प्रशासनाने सांगीतले आहे.