टीम हॅलो महाराष्ट्र : धडाकेबाज सलामीवर, हिटमॅन रोहित शर्माच्या शतकी खेळाच्या जोरावर आणि वेगवान गोलंदाज मोहम्मद शम्मीच्या अचूक माऱ्यावर भारताने अखेरच्या सामन्यात ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय मिळविला आहे. या विजयाबरोबरच ही एकदिवसीय मालिका देखील भारताने खिशात घातली आहे. पाहिल्याच सामन्यात दारुण पराभवाचा सामना करावा लागलेल्या भारतीय संघाने दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलीयावर मात करत जबरदस्त पुनरागमन केले. कामगिरीतील सातत्य कायम ठेवत आज अखेरच्या तिसऱ्या सामन्यात विजय मिळवत तीन दिवसीय मालिकाही जिंकली. याबाबरोबरच ऑस्ट्रेलीयाचे भारतीय भूमीत सलग दुसरा मालिका विजय मिळविण्याचे स्वप्न धुळीस मिळविले.
सनथ जयसूर्याच्या 28 शतकांचा विक्रम मोडणाऱ्याबरोबरच रोहित शर्माने अजून एक महत्वपूर्ण विक्रम आपल्या नावावर नोंदविला आहे. एकदिवसीय सामन्यात सर्वात वेगवान 9000 धावांचा टप्पा पार करणारा रोहित शर्मा तिसरा फलंदाज ठरला आहे. एकदिवसीय सामन्यात 9000 धावांचा टप्पा सर्वात वेगाने पार करणारा फलंदाज हा विराट कोहली असून दक्षिण आफ्रिकेचा डिव्हिलर्स दुसऱ्या स्थानावर आहे.
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्मिथचे शतक व्यर्थ ठरले. रोहित शर्माने बेंगळुरूमध्ये शतक झळकावल्यानंतर श्रीलंकेचा माजी दिग्गज फलंदाज सनथ जयसूर्याचा विक्रम मोडला. रोहित शर्माने आता वनडेमध्ये 29 शतके ठोकली आहेत.सनथ जयसूर्याने त्याच्या वनडे कारकिर्दीत 28 शतके ठोकली होती. वन डे इंटरनॅशनलबद्दल बोलताना रोहित शर्मा सर्वाधिक शतके ठोकणार्या फलंदाजांच्या यादीत सनथ जयसूर्याला मागे ठेवून चौथ्या क्रमांकावर आला आहे.