रोहित वेमुलाला आंबेडकरराइट् स्टुडंट्स ऑर्गनायझेशनकडून श्रद्धांजली

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे प्रतिनिधी : हैदराबाद विद्यापीठात आत्महत्या केलेल्या रोहित वेमुला या विद्यार्थ्याला फर्ग्युसन कॉलेमधील आंबेडकरराइट् स्टुडंट्स ऑर्गनायझेशनच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. जंगली महाराज रस्त्यावरील झाशीची राणी चौकात फर्ग्युसन तसेच इतर कॉलेमधील विद्यार्थ्यांनी रोहित वेमुलाला श्रद्धांजली अर्पण केली.

आज जे देशामध्ये विद्यार्थ्यांवर हल्ले होत आहेत आणि आजच्या परिस्थिती मध्ये जो विद्यार्थी आवाज उठवत आहेत, याची प्रेरणा मुळत: रोहित वेमुलापासून चालू होते.रोहित वेमुलाची ही आत्महत्या नसून ही इथल्या जातीयवादी, मनुवादी सरकारने केलेला हा एक संशयित मर्डर आहेत. अशा भावना या प्रसंगी व्यक्त करण्यात आल्या. तसेच या प्रकरणाची सरकारने लवकरात लवकर चौकशी करून खऱ्या आरोपींना पकडावे अशी मागणी विद्यार्थ्यांच्या वतीने करण्यात आली. रोहित वेमुलाने १७ जानेवारी २०१६ रोजी आत्महत्या केली होती. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने पत्र लिहिले होते. रोहित वेमुला हा पीएचडीचा विद्यार्थी होता. त्याला जातीय अत्याचाराला सामोरे जावे लागल्यामुळे त्याने आत्महत्या केली, असा आरोप विद्यार्थी संघटनांनी केला आहे.

या प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर तसेच वंचित बहुजन आघाडीचे शिवाजीनगर विधानसभा मतदार संघाचे उमेदवार अनिल भाऊ राडे, ओंकारभाऊ कांबळे, तसेच फर्ग्युसन कॉलेजमधील विद्यार्थी व विद्यार्थीनी उपस्थित होते.

Leave a Comment