हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन |भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचा आज ८८ वा वाढदिवस आहे.यूपीएच्या कार्यकाळात मनमोहन सिंग दोनदा पंतप्रधान राहिले. २००४-१४ पर्यंत ते भारताचे पंतप्रधान होते. पंतप्रधान होण्यापूर्वी ते १९९१ मध्ये नरसिंहराव सरकारमधील आर्थिक सुधारणांकरिता परिचित होते. त्या काळात त्यांनी केलेल्या आर्थिक सुधारणा आणि त्यानन्तर झालेल्या आर्थिक प्रगतीमुळे त्यांची कार्यक्षम राजकारणी म्हणून प्रतिमा बनली. मनमोहनसिंह हे अर्थशास्त्रात उच्चशिक्षित आहेत. त्यांनी पंजाब विद्यापीठ, केम्ब्रिज विद्यापीठ आणि ऑक्सफर्ड विद्यापीठ येथून शिक्षण घेतले आहे. केवळ साधेपणाच नाही तर ते भारतीय अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी देखील ओळखले जातात.
आज आम्ही आपणास मनमोहनसिंह यांच्या वाढदिवशी संबंधित खास गोष्टी सांगत आहोत. मनमोहन सिंग यांचा जन्म २६ सप्टेंबर १९३२ रोजी फाळणीपूर्वी भारताच्या पंजाब प्रांतात झाला. जो आता पाकिस्तानचा भाग आहे. त्यांनी पंजाब विद्यापीठ, केंब्रिज विद्यापीठातून अभ्यास करतानाच ऑक्सफोर्ड विद्यापीठातून अर्थशास्त्र विषयात डॉक्टरेटचे शिक्षण घेतले.
मनमोहन सिंग यांनी पंजाब विद्यापीठ तसेच दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आणि दिल्ली विद्यापीठात शिक्षण घेतले. काँग्रेसचे नेते मनमोहन सिंग हे १९८५ ते ८७ पर्यंत नियोजन आयोगाचे प्रमुखही होते. यासह त्यांनी यापूर्वी १९७२ ते ७६ दरम्यान मुख्य आर्थिक सल्लागारासह अनेक महत्त्वाची पदे भूषवली. मनमोहन सिंग यांनी माजी पंतप्रधान पीव्ही नरसिंह राव यांच्या सरकारमध्ये अर्थमंत्री म्हणून काम पाहिले. या कालावधीत आर्थिक अर्थसंकल्प सादर करताना त्यांनी १९९१-९५ दरम्यान देशाच्या अर्थव्यवस्थेस नवीन आणि मजबूत मार्ग दिला.
मनमोहन सिंग यांनी १९८२ ते ८५ पर्यंत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर म्हणूनही काम पाहिले. १९९८ ते २००४ या काळात त्यांनी राज्यसभेतील विरोधी पक्षनेते म्हणून काम पाहिले. त्यानंतर, यूपीएच्या नेतृत्वात अटलबिहारी वाजपेयी यांच्या एनडीए सरकारचा पराभव करून २००४ ते २०१४ दरम्यान मनमोहन सिंग यांनी १३ वे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली.
मनमोहन सिंग यांनी परराष्ट्र व्यापार उदारीकरण, आर्थिक उदारीकरण, कर सुधारणा आणि विदेशी गुंतवणूकीचे मार्ग असे अर्थमंत्र्यांच्या कार्यकाळात महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. या निर्णयांमुळे केवळ अर्थव्यवस्थेला नवीन वेग मिळाला नाही तर शक्तीही मिळाली. अर्थमंत्री म्हणून मनमोहन सिंग यांनी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. त्यांनी जागतिक बाजारपेठेत भारत दाखवून दिला. यासह देशात आर्थिक क्रांती आणि जागतिकीकरण सुरू करण्याचे श्रेयही मनमोहन सिंग यांना जाते.
पंतप्रधान म्हणून त्यांनी रोजगाराच्या क्षेत्रात मोठे निर्णय घेतले. मनरेगाच्या माध्यमातून ऐतिहासिक पाऊल उचलले. लोकांच्या घरी चुली पेटण्यासाठी त्यांनी प्रत्येक हाताला काम देण्याच्या कल्पनेने मोठी भूमिका बजावली.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’