विचारांची भूक आहे तिथे साहित्य संमेलन घ्या – रा.रं. बोराडे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

संत गोरोबाकाका साहित्य नगरी,उस्मानाबाद : महानगरात होणारी संमेलनं आता थांबवा, ग्रामीण भागात विचारांची, साहित्याची भूक आहे तिथे साहित्य संमेलन घ्या, असे मत ज्येष्ठ साहित्यिक रा.रं बोराडे यांनी व्यक्त केले. 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते.

बोराडे म्हणाले की, मराठवाड्यातील बीड, उस्मानाबाद या भागात साहित्यिक वातावरण नाही. हे साहित्यिक वातावरण निर्माण करण्यासाठी अशा प्रकारची साहित्य संमेलन होणं गरजेचं आहे.

साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी बोराडे यांच्या नावाची देखील चर्चा होती. त्यांनी अध्यक्षपद का नाकारलं याच स्पष्टीकरण या समारोपाच्या भाषणात दिले. त्यांनी म्हंटले की, वयाची पंच्याहत्तरी ओलांडल्यावरच मी ठरवलं होतं की आता साहित्य संमेलनाचा अध्यक्ष व्हायच नाही. वय निघून गेल्यावर लग्न करणाऱ्या पुरुषाला घोडनवरा म्हणतात. तो घोडनवरा मला व्हायचं नव्हतं.

चांगले वाचक व्हा

बोराडे म्हणाले की, मराठीचा वाचक कमी होत आहेत हे आपल्याला मान्य करावा लागेल. आमचे मराठी साहित्यिकच ऐकमेकांच साहित्य वाचत नाहीत. मराठी साहित्यिकांनी एकमेकांच वाचलं तरी मराठी समृद्ध होईल. दुसऱ्याच दहा पट्टीने वाचलं तेव्हा कुठं मी एक पट लिहू शकलो. तुम्हाला जर चांगले लेखक व्हायचे असेल तर तुम्ही चांगले वाचक व्हा. आता मी बालसाहित्य लिहितोय.

साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले, स्वागताध्यक्ष नितीन तावडे, साहित्य परिषद पुणे शाखेच्या कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार आणि इतर मान्यवर या समोरोपच्या कार्यक्रमाला उपस्थित होते.






Leave a Comment