विनाआवाजाचे फटाके वाजवण्यावर निर्बंध नाहीत, मुख्यमंत्र्यांची बच्चेकंपनीला खूषखबर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई | सर्वोच्च न्यायालयाने फटाके रात्री आठ ते दहा या वेळेतच फोडण्याचे आदेश दिले आहे . इतक्या कमी कालावधीत फटाके फोडण्याची मुभा दिल्याने अनेकांमध्ये नाराजी आहे. यातच बच्चे कंपनीची नाराजी दूर करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आनंदाची बातमी दिली. विनाआवाजाचे फटाके वाजवण्यावर निर्बंध नसून कधीही वाजवता येतील असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.

वर्षा बंगल्यावर पत्रकारांशी संवाद साधतांना त्यांनी राज्यातल्या अनेक ज्वलंत मुद्द्यावर चर्चा केली. यावेळी त्यांनी राज्यातील दुष्काळी परिस्थितीपासून दिवाळीत फटाके वाजवण्यावर घातलेले निर्बंध यावर भाष्य केले.

राज्यातील 151 तालुक्यांत दुष्काळ जाहीर केल्यानंतर आता आपण दुष्काळी भागांची माहिती घेत त्या भागात स्वतः जाऊन दौरा करणार आहोत . दुष्काळी भागात कोणत्याही उपाययोजना राबवण्यात येत आहेत. त्याचा मी प्रत्यक्ष जाऊन आढावा घेणार आहे. दुष्काळाचा मुद्दा उपस्थित करून विरोधी पक्षांना यावर केवळ राजकारण करायचे आहे असा आरोप त्यांनी केला.

राज्यात 49 लाख 50 हजार शेतकऱ्यांची कर्जमाफीसाठी नोंद झाली आहे. आतापर्यंत शेतकऱ्यांना 21 हजार कोटी रुपयांची कर्जमाफी देण्यात आली अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली.

Leave a Comment