शहरातल्या पाणी कपातीच्या विरोधात राष्ट्रवादी चे महापालिकेसमोर आंदोलन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे | सुनिल शेवरे

शहरात पाणी कपाती च्या विरोधात विरोधी पक्ष आक्रमक झाले असून आज पुण्यात पालिके समोर आंदोलन करण्यात आले. आंदोलन कर्त्यांनी प्रशासनाचा तीव्र निषेध केला.

महापालिकेला शहराचे पाण्याचे नियोजन जमले नसून बाकी सर्व प्रश्न देखील सोडविण्यात शासन आणि महापालिका अपयशी ठरली आह. येत्या निवडणुकीत जनता यांना धडा शिकवेल यात शंका नाही असे शहर अध्यक्ष तुपे म्हणाले.

कालवा फूटीला पालिकाच जबाबदार आहे. वेळीच उपाययोजना केल्या असत्या तर ही वेळ आली नसती. पाण्याचा प्रश्न व लोडशेडिंग चा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. जनता सगळ पाहत आहे. जनतेला हे सरकार जर गंभीर घेत नसतील तर जनता यांची जागा दाखवेल असेही तुपे यांनी म्हटले.

तसेच आंदोलना दरम्यान शहर अध्यक्ष यांनी लोडशेडिंग च्या प्रश्नी मोठ आंदोलन करणार असल्याची माहिती दिली. या वेळी शहर अध्यक्ष चेतन तुपे पाटील, महिला शरह अध्यक्षा रूपाली चाकणकर , रविंद्र माळवदकर , सुभाष जगताप, केंटोमेंट अध्यक्ष भोलासिंह अरोरा , प्रभाग क्र.२८ अध्यक्ष अर्जुन गांजे आदि.उपस्थित होते.

Leave a Comment