वर्धा | नागपूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील बरबडी शिवारात सायंकाळी साडेपाचच्या सुमारास नागपूर कडुन चंद्रपुर कडे जात असलेल्या शिवशाही बसने दुचाकीला जोराची धडक दिली या धडकेत दोन जणांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.
अशोक तालवटकर (वय 35) आणि रोशन भोयर (वय 32) दोघेही राहणार चिखली जागीच ठार झाले आहे. तर नितेश तालवटकर (वय 24) असे गंभीर जखमी झालेल्या तरूणाचे नाव आहे. त्याला उपचारासाठी सेवाग्राम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.