शिवसेनेचा १३५ जागांचा दावा, भाजपा म्हणते ११५ जागा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

वृत्तसंस्था | २०१९ लोकसभेच्या निवडणुकांसाठी शिवसेना आणि भाजपची युती झाली होती. आताही २०१९ च्या विधानसभा निवडणुकीसाठी दोन्ही पक्षांमध्ये जोरदार गडबड सुरू आहे. फरक एवढाच आहे की यावेळी युती चालविण्यासाठी भाजप सुकाणू स्थितीत आहे. मात्र विधानसभेच्या निवडणुकीमध्ये १३५ पेक्षा कमी जागा लढविण्यास शिवसेना तयार नसल्याचे उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना स्पष्ट केले आहे. तसेच ‘ऊन पावसात एकत्र राहिलेल्या पक्षांनी जागा वाटपाचा मुद्दा कितपत लावून धरायचा ”असा भावनिक सवाल करत इतक्या जागांच्या खाली उतरायचे तरी कसे आवाहन केले आहे.

 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजपने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला स्पष्ट केले आहे की, २०१४ मध्ये दोन्ही पक्षांनी जिंकलेल्या जागा घेतल्यानंतर उर्वरित जागा समान प्रमाणात वाटल्या जातील. यामुळे युतीच्या जागावाटपाच्या आराखड्यातील जवळपास ११ जागा शिवसेनेला सोडाव्या लागतील. शिवसेनेने मात्र यावर आक्षेप नोंदवत लोकसभा निवडणुकीपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी ‘विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटप हे दोन्ही भागीदारांसाठी समान असेल’ असे वचन दिले असल्याचे स्पष्ट केले आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने ६३ आणि भाजपाने १२३ जागा जिंकल्या होत्या. गेल्या आठवड्यात उद्धव ठाकरे म्हणाले होते की, ‘विधानसभा निवडणुकीसाठी युतीची घोषणा दोन दिवसात होईल, मात्र आता सात दिवस झाले आहेत.’ त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संमभ्रमावस्था असल्याचे पाहायला मिळत आहे.

 

दरम्यान शिवसेनेची १३५ जागांची मागणी अवास्तव असल्याचे भाजपाचे प्रथमदर्शनी मत येत आहे. तर शिवसेनेची आजची ताकद लक्षात घेता या ११५ पेक्षा जास्त जागा त्यांना द्यायच्या का असा प्रश्न मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष यांना पडला आहे. दरम्यान भाजपा ची घौडदौड लक्षात घेता त्यांना या १५५ जागा तरी लढण्यास गरजेचे वाटत आहे. बाहेरून आलेल्या आमदार मंडळींना या जागांवर लढवणे आवश्यक असल्याचे नेत्यांकडून सांगण्यात येत आहे.
२०१४ मध्ये शिवसेना २० जागांचा कट घेण्यास तयार होती. पण १५० च्या खाली जाण्यास तयार नव्हती, ज्यामुळे त्यावेळेस युती यशस्वी झाली नाही, असा भाजपचा दावा आहे. आता भाजपपेक्षा त्यांना कमी जागा मिळतील हे शिवसेनेच्या नेतृत्वाने मान्य केले असले तरी त्यांना देण्यात आलेल्या १२८ जागा स्वीकारण्यास शिवसेना तयार नाही आणि त्यांना किमान १३५ जागा हव्या आहेत.

 

दोन्ही बाजूंसाठी जागा वाटप हे एक कठीण मैदान बनले आहे. विधानसभा निवडणुकीची उत्तम तयारी करण्यासाठी शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांनी कॉंग्रेस व राष्ट्रवादीचे नेते सामावून घेतले आहेत. तथापि, या पार्श्वभूमीवर पक्ष स्वतंत्रपणे निवडणुका लढविण्याच्या योजना बनवत असल्याची शंका देखील निर्माण झाली आहे.

Leave a Comment