संजय राऊतांचा उद्धव आणि आदित्य ठाकरेंना धोबीपछाड

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

विशेष प्रतिनिधी | सध्या राज्यात सत्तास्थापनेवरून रणसंग्राम सुरु आहे. महाराष्ट्रातील जनतेने महायुतीच्या पारड्यात स्पष्ट बहुमत टाकून देखील भजप शिवसेना अद्याप सत्ता स्थापन करू शकले नाहीत. आमची दारे चर्चेसाठी कायम उघडी असल्याचे भाजप सांगतंय परंतु मुख्यमंत्री पदाबाबत तडजोड नाही अशी भूमिका घेतय. तर मुख्यमंत्री पदाशिवाय चर्चाच नाही अशी भूमिका शिवसेनेनं घेतली आहे. त्यामुळे सत्तेचं घोड काही पुढे सरकत नाहीये. परंतु या सगळ्या घडामोडीत सार्वधिक चर्चेत आलेलं व्यक्त्तमत्व म्हणजे खासदार संजय राऊत.

विधानसभा निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर संजय राऊत हे गूगलवर मोठ्या प्रमाणात सर्च झालेले पाहायला मिळतायत. मागील काही दिवसांपासून राऊत रोज सकाळी साडे नऊ ते साडेदहाच्या सुमारास पत्रकार परिषदेमधून भाजपावर टीका करताना “मुख्यमंत्रीपद अडीच वर्षासाठी शिवसेनेला हवे आहे या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत,” असं सांगताना दिसत आहेत. त्यामुळेच राऊत यांचे नाव राज्यातीलच नाही तर देशभरातील प्रसारमाध्यमांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे.

गूगल ट्रेंड नुसार राज्यासह देशभरातून संजय राऊत यांच्याबद्दल मोठ्या प्रमाणावर माहिती सर्च होताना पाहायला मिळत आहे. या बाबतीतब त्यांनी शिवसेनेचे पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे आणि नवनिर्वाचित आमदार आदित्य ठाकरे यांना देखील धोबीपछाड दिली आहे.

निवडणूका सुरू असताना उद्धव ठाकरे यांचे तर निवडणूक झाल्यानंतर चार दिवस आदित्य ठाकरे यांचे नाव ट्रेंडिंग मध्ये होते. परंतु २८ ऑक्टोबर नंतर संजय राऊत यांच्या नावाने कमालीची उभारी घेतली आहे. मुख्यमंत्रीपद आणि सत्तेच्या वाटाघाबद्दल चर्चा सुरु असताना ठाकरे पिता पुत्र शेतकऱ्यांच्या नुकसान पाहणीच्या दौऱ्यावर होते. तर संजय राऊत सातत्याने माध्यमांसमोर येऊन पक्षाची भूमिका मांडत आहेत. त्यामुळे राज्यातच नाही तर देशभरातुन राऊत यांच्याबद्दल माहिती सर्च होताना पाहायला मिळत आहे.

Leave a Comment