टीम, HELLO महाराष्ट्र |चाकूसह संसदेत प्रवेश करण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका अज्ञात व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही व्यक्ती संसदेच्या गेट क्रमांक १ मधून आत जाण्याच्या प्रयत्नात होती. या व्यक्तीला संसद पोलीस ठाण्यात नेण्यात आले आहे. संसदेत चाकूसह प्रवेश करणाऱ्या या तरुणाचे नाव सागर इसा असल्याचे समजते. सागर इसा हा दिल्लीतील लक्ष्मी नगर येथील रहिवासी असल्याची माहिती आहे.
तो कशासाठी आला होता, चाकू घेऊन संसदेत प्रवेश करण्याचा त्याचा उद्देश काय, याबाबतही काही समजू शकलेले नाही. दरम्यान, ताब्यात घेण्यात आलेल्या या तरुणाची संसंद पोलीस ठाण्यात चौकशी करण्यात येत आहे. सध्या संसदेचे अधिवेशन सुरू नसल्याने संसदेसमोरील मार्ग वाहतुकीसाठी खुला आहे.
मात्र, असे असले तरी संसदेत कुणालाही प्रवेश देण्यात येत नाही. अशात अचानक एक तरुण संसदेत घुसण्याचा प्रयत्न करत असल्याचे तैनात असलेल्या सीआरपीएफ जवानांच्या लक्षात आले. त्यासोबत या तरुणाच्या हातात चाकू असल्याचे त्यांना आढळले. त्यानंतर तातडीने त्या तरुणाला अडवत ताब्यात घेण्यात आले. २००१ साली संसदवेर झालेल्या हल्ल्यानंतर या परिसरातील सुरक्षा अधिक कडक करण्यात आली होती. संसद परिसर आवारात नेहमीच सुरक्षा रक्षकांचा पहारा असतो.