सबरीमाला प्रकरण : मीडिया आणि भक्तांना मंदीरात जाण्यापासून रोखू नये – उच्च न्यायालय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

त्रिवेंद्रम | भक्त आणि प्रसार माध्यमांना सबरीमाला मंदीरात जाण्यापासून थांबविता येणार नसल्याचे केरळ उच्च न्यायालाने म्हटले आहे. तथापि, सरकारला मंदीराच्या रोजच्या कामकाजात हस्तक्षेप करता येणार नाही. तसेच परिसरात वाहनांची तोडफोड केल्याप्रकरणी विभागीय चौकशी करण्यात यावी असेही म्हटले आहे.

राज्य सरकार सबरीमाला मुद्दाचे राजकारण करत असल्याचा आरोप काँग्रेस नेत्यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर केला असून हे प्रकरण सोडविण्यासाठी कायदा करण्याची मागणीही त्यांनी केली.

तत्पूर्वी काँग्रेस नेते पी. जे. कुरियन, रमेश चेन्नीथला यांनी केंद्र व राज्य सरकारवर या मुद्दाचे राजकारण केले जात असल्याचा आरोप केला होता. राज्य सरकार हा मुद्दा सोडविण्याऐवजी त्याचे राजकारण करत असल्याचे त्यांनी म्हटले होते. राज्य सभेचे माजी उपाध्यक्ष पी. जे. कुरियन यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले कि, आम्हाला कुठल्याही प्रकारची हिंसा नको आहे. परंतु 10 ते 50 वर्ष वयोगटाच्या महिलांना मंदीरात प्रवेश देताना राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची बळपूर्वक अंमलबजावणी करत आहे.

Leave a Comment