सरकार कसं असतं हे माहितीच नव्हतं – मंत्री महादेव जानकर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सोलापूर प्रतिनिधी |शासनाने इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिले. त्याचबरोबर सरकारने धनगर समाज बांधवांना ही महामंडळाच्या माध्यमातून हजार कोटीं रुपये उपल्ब्ध करुन दिले. असं म्हणत ‘सरकार कसं असतं हे आम्हालाच माहिती नव्हतं’ त्यामुळे धनगर आरक्षणाचा प्रश्न सुटला नसल्याचे राज्याचे दुग्धविकास आणि पशुपालन मंत्री महादेव जानकर यांनी कबुली दिली. मंगळवेढा येथे जानकर यांच्या उपस्थितीत रासपचा शेतकरी मेळावा पार पडला त्यावेळी  सभेत ते बोलत होते.

गेली अनेक वर्षे धनगर आरक्षणाचा प्रश्न शासन दरबारी प्रलंबित आहे. महादेव जानकार हे धनगर समाजाचे नैतृत्व मंत्री झाल्यांनतर हा प्रश्न मार्गी लागेल असे समाजातील लोकांना वाटत होते. मात्र जानकार यांनी यामागचे कारण मेळाव्यात सांगितले ते म्हणाले,’धनगर समाजाचे आरक्षण हे आता कोर्टातून मिळणार आहे.परंतु प्रत्येक वेळी आम्हाला विचारले जाते की मागील पाच वर्षापूर्वी आरक्षण का दिले नाही ,परंतु सरकार कस असतं हे आम्हाला माहीतच नव्हतं’ अशाप्रकारे जानकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या अज्ञानाचीच कबुली दिली.

Leave a Comment