सरदार वल्लभभाई पटेल जयंती आणि इंदिरा गांधी स्मृतीदिन उत्साहाय साजरा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली | सतिश शिंदे

देशाचे प्रथम गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांची १४३ वी जयंती ‘राष्ट्रीय एकता दिवस’ म्हणून आज महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्र येथे साजरा करण्यात आला. तर देशाच्या पहिल्या महिला प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या ३४ वा स्मृतीदिनी अभिवादन करण्यात आले. कोपर्निकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त (अ.का.) समीर सहाय यांनी सरदार पटेल व इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी सहायक निवासी आयुक्त सुमन चंद्रा, इशु संधू, अजितसिंह नेगी यांच्यासह महाराष्ट्र सदनातील व महाराष्ट्र परिचय केंद्रातील अधिकारी -कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी उपस्थित सर्वांनी सरदार पटेल व इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
सरदार वल्लभाई पटेल यांची जयंती ‘राष्ट्रीय एकता दिवस’ म्हणून तर इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी ‘राष्ट्रीय संकल्प दिवस’ म्हणून पाळण्यात येते. यावेळी निवासी आयुक्त(अ.का.) समीर सहाय यांनी उपस्थित अधिकारी-कर्मचाऱ्यांना राष्ट्राची एकता, अखंडता व सुरक्षा अबाधित राखण्याची शपथ दिली.

महाराष्ट्र परिचय केंद्रात सरदार पटेल व इंदिरा गांधी यांना अभिवादन

महाराष्ट्र परिचय केंद्रात सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती आणि इंदिरा गांधी यांचा स्मृतिदिन साजरा करण्यात आला. महाराष्ट्र परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी सरदार पटेल व इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले. जनसंपर्क अधिकारी अमरज्योत कौर अरोरा, माहिती अधिकारी अंजु निमसरकर-कांबळे, उपसंपादक रितेश भुयार यांच्यासह उपस्थित कर्मचाऱ्यांनी यावेळी सरदार पटेल व इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली. उपसंचालक श्री.कांबळे यांनी यावेळी उपस्थित अधिकारी-कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथ दिली.

Leave a Comment