साहेब चार वेळेस मुख्यमंत्री होते म्हणून मी पण चार वेळा उपमुख्यमंत्री झालो – अजित पवार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे : शरद पवार साहेब चार वेळेस मुख्यमंत्री होते, म्हंटल चला आपण पण चार वेळेस मुख्यमंत्री होऊ, अशी मिश्किल टिप्पणी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी करताच एकच हशा पिकला. ते बारामतीतील कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते. यावेळेस बोलताना त्यांनी विधानसभा निवडणुकीनंतर झालेल्या सत्ता नाट्यावर मिश्किल भाष्य केले. कस का असेना माझ्या पध्तीने मी चार वेळा उपमुख्यमंत्री झालोच ना, असे अजित पवार म्हणाले.

बारामतीतील बाजार समीतीच्या रयत भवनमध्ये माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीसंदर्भात कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात अजित पवार बोलत होते. ते माळेगाव कारखान्याला केलेल्या मदतीबद्दल सांगत होते.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी चार वेळेस राज्याचे मुख्यमंत्री भूषविले आहे. त्याचा संदर्भ देत मी पण चार वेळा उपमुख्यमंत्री झालो असे अजित पवार म्हणाले. अजित पवार यांनी आघाडी सरकारच्या काळात दोन वेळा उपमुख्यमंत्री पद भूषवले आहेत. तर नुकतेच काहि महिन्यांपूर्वी त्यांनी बंड करत भाजपसोबत जाऊन उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्यानंतर त्यांनी महाविकासआघाडी सरकारमध्ये पुन्हा उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. अशा प्रकारे अजित पवार यांनी चार वेळा उपमुख्यमंत्री पद भूषवले आहे.

Leave a Comment