सुरेश रैनाच्या जागी चेन्नई कडून खेळणार इंग्लडचा नंबर वन बॅट्समन डेव्हिड मालन ????

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | चेन्नई सुपर किंग्सचा धडाकेबाज फलंदाज आणि मिस्टर आयपीएल म्हणून ओळखला जाणारा डावखुरा फलंदाज सुरेश रैनाने इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलच्या 13 व्या हंगामातून आपले नाव मागे घेतले आहे. सुरेश रैनाने वैयक्तिक कारणे सांगून आयपीएल २०२० मध्ये न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. रैना चेन्नई सुपर किंग्जचा महत्वाचा खेळाडू आहे. अशा परिस्थितीत चेन्नईसाठी हा मोठा धक्का होता, परंतु सीएसके आता रैनाच्या रिप्लेसमेंटची तयारी करत असून लवकरच त्याची घोषणाही होईल.

चेन्नई सध्या रैनाची रिप्लेसमेंट म्हणून इंग्लंडचा आक्रमक आणि भरवशाचा फलंदाज डेव्हिड मालनकडे पाहत आहे. डेव्हिड मालन सध्या टी -20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रथम क्रमांकाचा फलंदाज आहे. डेव्हिड मालन मधल्या फळीत फलंदाजी करतो तर रैना देखील सीएसकेकडून तीसर्या क्रमांकावर खेळला आहे. अशा परिस्थितीत डेव्हिड मालन हाच रैनाची रिप्लेसमेंट म्हणून चेन्नईसाठी सर्वोत्कृष्ट ठरेल. टीममधील सूत्रांनी एका वेबसाइटशी बोलताना स्पष्ट केले की चेन्नईचा संघ डेव्हिड मालनशी याबबद्दल चर्चा करत आहे.

सीएसकेच्या एका सूत्राने सांगितले की, “सध्या तरी ही फक्त चर्चा आहे, काहीही झाले नाही.खरं तर डेव्हिड मालन हा एक सर्वोत्कृष्ट टी -20 खेळाडू आहे. तो रैनासारखाच डावखुरा आहे, पण तो रैनाची रिप्लेसमेंट आहे की नाही याबबद्दल अंतिम निर्णय झालेला नाही. डेव्हिड मालनने आत्तापर्यंत 16 टी -20 सामन्यांत एका शतकासह 48.71 च्या सरासरीने 682 धावा केल्या आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’

Leave a Comment